शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेत विविध संतांच्या वंशजांचा समावेश…

 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी व समस्यांचे निवारण करुन भक्कम पाठबळ देण्याकरिता आणि हिंदूत्ववादी विचारांच्या प्रसाराकरीता शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना करण्यात आली असून हभप अक्षय महाराज भोसले हे यांना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या बरोबर महाराष्ट्रातील विविध संतांच्या वंशजांची धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

 

यामध्ये संत नामदेव महाराजांचे वंशज हभप ज्ञानेश्वर महाराज नामदास, संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप माणिक महाराज मोरे, संत एकनाथ महाराजांचे वंशज हभप पुष्कर महाराज गोसावी, तसेच कुंदाताई उगले, महानुभाव शाम महाराज जामोदेकर, संत साहित्याचे अभ्यासक अरुण जगताप, प्रभंजंन महातोले यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वरील सर्व सदस्यांचा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा विस्तार करताना कार्य कर्तृत्ववाचा व अभ्यासाचा अध्यात्मिक क्षेत्रासमवेत शिवसेना पक्षाला सुध्दा फायदा होईल असे शिवसेना समन्वयक महाराष्ट्राचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.