राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी…
गडचिरोली जिल्हातंर्गत कुरखेडा तालुक्यात मौजा सोन्सरी नावाचे गाव आहे.या गावात आतापासूनच पाण्याच्या टंचाईने भिषण रुप धारण केले आहे.
मौजा सोन्सरी येथे अनेक दिवसापासून पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी व सचिवांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र व्यवहाराद्वारे माहिती देणे आवश्यक आहे.
मात्र,मौजा सोन्सरी येथील उद्भवलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या संबंधित उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी जातीने तात्काळ लक्ष देत तेथील पाणी समस्या दूर करावी अशी आर्त हाक मौजा सोन्सरी येथील महिला-पुरुषांची आहे.
याचबरोबर सोन्सरी ग्रामपंचायत पदाधिकारी व सचिव यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वेळीच हालचाली करणे अगत्याचे झाले आहे.
मौजा सोन्सरी येथील भिषण पाणी समस्यांकडे संबंधितांनी कानाडोळा करुन जमणार नाही आणि बहिरे-आंधळे होवून चालणार नाही,अशीच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
आजच्या स्थितीत मौजा सोन्सरी येथील नागरिकांना पाण्याची अत्यावश्यक गरज असून,सध्यास्थितीत नळाद्वारे फक्त 1 किंवा 2 माठ पाणी मिळत असल्याने,भर उन्हाळ्यात मौजा सोन्सरी येथील महिला-पुरुषांची तहान भागणे शक्य नाही.
सोन्सरी येथील सरपंच,उपसरपंच व प्रशासक यांनी मौजा सोन्सरी येथील महिला-पुरुषांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वेळीच केलेली बरी,अशी चर्चा जनमानसात आहे.
पाण्याची समस्या दूर केली नाहितर ग्रामपंचायत कार्यालयावर मौजा सोन्सरी येथील महिलांद्वारे घागर मोर्चा काढण्यात येणार आहे.



