शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- तालुक्यातील मासळ परिसरात अवैध दारू विक्री जोमात सुरु आहे.दारु विक्रेत्यांकडून हप्ता’मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अवैध दारु धंदे बंद करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मासळ परिसरात अवैध दारु विक्रीला जोर आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मासळ परिसरात अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री खुलेआम सुरु आहे.रस्त्यालगत ठिकठिकाणी अवैधरित्या दारु मिळत आहे.
चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा मासळ परिसरात अवैध दारुचे अड्डे खुलेआम सुरु आहेत.दारु विक्री करणाऱ्यांची दहशत व अवैध दारुचे व्यवसाय खुलेआम सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



