Home देशविदेश धर्माची व्याख्या आणि धर्माचे प्रकार…

धर्माची व्याख्या आणि धर्माचे प्रकार…

 धर्माची व्याख्या प्रकार दोन

एक — धर्म म्हणजे धारणा, धारणा म्हणजे विश्वास श्रद्धा आस्था भक्ती.

दोन — कर्तव्य म्हणजेच धर्म. कर्तव्याला मूकतो माणूस माणूस ना उरतो. ( श्रीकृष्णची व्याख्या )

 धनुरधारी अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर युद्ध करण्यासाठी उतरतो तेव्हा तो विचारात पडतो की, ” मी माझ्याच भावांना, नातेवाईकांना, सोयऱ्या धायऱ्यांना, गुरला, आणि निस्पाप सैनिकांस कसे मारू? “. तेंव्हा भगवान श्रीकृष्ण त्यास कर्तव्य करायला सांगतात. कर्तव्य म्हणजेच असे कर्म कीं जे केलेच पाहिजे. जे अनिवार्य आहे. असे कर्म म्हणजेच धर्म होय. अन्याय, अत्याचार, भ्रस्टाचार असे कृत्य म्हणजेच ” आधार्म ” होय. अधर्मास दया क्षमा शांती हा उपाय किंवा हा धर्म पाळणे म्हणजे आधार्मच होय. याचा अर्थ कृष्णनी नैतिकतेची व्याख्या केली, नैतिकतेचा अर्थ सांगितला, तो म्हणजे दया क्षमा शांती हा धर्म जरी असला, तरी सत्य न्याय निती च्या विचारात तो बसत नाही, याचा अर्थ सत्य न्याय निती, हाच खरा धर्म असून, दया क्षमा शांती हे धर्माचे धोरण आहे, म्हणून हे धोरण धर्मास लागू पडते. अधर्मास नाही. अन्याय अत्याचार, भ्रस्टाचार, हिंसा हा धर्म नसून अधर्म आहे. हिंसा या अधर्मास हिंसेनेच मारावे लागते. लोखंडाला लोखंडच कापते, लाकडाने नाही. याचा अर्थ हिंसा प्रसंगनुसार अधर्म तर धर्म पण सिद्ध होते. हे महाभारताच्या शिकवणूक ने सिद्ध होते. हिंसा हे कर्तव्य सिद्ध होते. याचा अर्थ काल वेळ परिस्थिती नुसार नैतिकता बदलत असतें. धर्माची व्याख्या पण बदलते. म्हणूनच भगवान श्रीकृष्णने अर्जुनाला इहलोकीचा उपदेश दिला, तो म्हणजे ” कर्तव्याने घडतो माणूस, अन्यथा कर्तव्य नाही केले तर तो माणूस ना उरतो. म्हणजे त्यास माणूस म्हणणे चुकीचे आहे. असा माणूस एक तर हिंश्र पशु, किंवा भित्रे जनावर समजावे.

      भगवान श्रीकृष्णने ही ” इहलोकीची धर्माची व्याख्या करूनही अर्जुन ऐकेना म्हणून धर्माची दुसरी व्याख्या मम्हणजे धर्माचा दुसरा अर्थ सांगितला, तो पारलोकीक अर्थ, तो असा कीं, ” मी भगवान आहे, म्हणजे ईश्वर. मीच जन्म देतो, आणि मीच घडवितो आणि नष्ट पण करतो. मीं आत्मा होऊन तुझे शरीरात प्रवेश करून मीच सर्व अन्यायी अत्याचारी दुराचारी दुष्ठ लोकांचा संहार करून अधर्मास नष्ट करून धर्माची स्थापना करतो, सारे काही मीच करतो, हे अर्जुना, तूं फक्त निमित्त मात्र आहेस, तुला काहीच पाप लागणार नाही, तो लागलाच तर मला लागेल. पुनर्जन्मात काय होसील, याची चिंता करु नको. धर्माचे कामं करणे म्हणजे पुण्य कर्म चं होय. तुला दुष्ठ लोकांचे क्षालंन केल्याने पुण्याचं लागेल.तुझा पुनर्जन्म यामुळे चांगलाच मिळेल, नाहीतर हे तुझे जर पापी असेल तर हे कृत्य मीं करत असल्याने यास मीं जिम्मेदार असल्याने मला पाप लागेल, तूं पाप पुण्याचा विचार करु नको. ” या पारलोकिक ( स्वर्ग, नरक, पाप पुण्य , आत्मा ) तत्वज्ञान म्हणजे धर्म. ही धर्माची दुसरी व्याख्या.

       धर्माची तिसरी व्याख्या किंवा अर्थ म्हणजे इहलोकीची व्याख्या या व्याख्या नुसार धर्माचे म्हणजेच कर्तव्याचे पुढील प्रकार पडतात 

एक — भूतदया. यात पांचमहाभूतांचे संरक्षण करणे हे पहिले कर्तव्य होय. पांचमहाभुते ज्यांचे मुले जिवसृष्ठी जिवंत राहते, ते म्हणजे आप तेज वायू पृथ्वी आकाश.

दोन —- धर्माचा हा दुसरा प्रकार म्हणजे भूतदया. भूतदया म्हणजे जीवांचे संरक्षण, म्हणजेच पक्षी, प्राणी यांचा संहार न करता यांना जीवदान देणे, यांचेवर दया करणे, यांचे पालन पोषण करणे हे माणसाचे कर्तव्यच आहे, म्हणजे जिवमात्रांची काळ्जी घेणे हा मानवी धर्म होय.

तीन — तिसरा धर्म म्हणजे मानवधर्म होय. याचा अर्थ या जगातील सर्व माणसे सारखीच असून त्यांचेत वंश, रंग, वर्ण, लिंग, जात, प्रांत धर्म असा भेद करणे, भेदभाव, उच्चणीचता, अस्पृश्यता पाळणे हे अमानवीय कृत्य आहे. मानावाचा हक्क संपुष्टात आणणे होय. हा धर्म नसून आधार्म होय.

चार — धर्माचा चौथा प्रकार म्हणजे विश्वधर्म होय. याचा अर्थ संत ज्ञानेस्वरांनी सांगितला तो ” विश्व धर्म ” म्हणजे विश्वची हे माझे घर. सारे जग हे माझे घर आहे. म्हणून ” विश्वातमके देगा देवा ” अशी त्यांनी पसायदान मागितले, सर्व विश्व आणि विस्वातील माणसे यां सर्वांचे माणुसकीचे नाते जपाण्यासाठी. हा विश्वधर्म होय.

पाच —- धर्माचा पाचवा प्रकार म्हणजे राष्ट्रधर्म होय. देश म्हणजे केवळ दगड माती धोंडे, डोंगर पर्वत नद्या आकाश हवा यांचा आणि केवळ भौगोलिक सीमा असलेला पृथ्वीचा एक तुकडा नसून त्यात राहणाऱ्या सर्वच लोकांचा, माणसांचा देश आहे. तो निर्जीव नसून सजीव आहे. त्यास ( जनतेस ) विचार भावना आहेत, म्हणून देशातील जनतेला जर देशा विषयी प्रेम निष्ठा कर्तव्य असेल तरच तो केवळ देश न राहता राष्ट्र म्हणून राहील. आणि राष्ट्र ही संकल्पना लोकशाहीतच रुजते, हुकूमशाहीत नाही. कारण हुकूमशाहीत लोक गुलाम असतात, म्हणून गुलामाना हा देश मालकाचा आहे, आपला नाही, हा विचार आणि भावना त्यांचेत रुजतात.

  पाच — धर्माचा पाचवा प्रकार म्हणजे शेजाऱ धर्म. घराचा शेजारी, शेजारी गाव, शेजारी तालुका जिल्हा प्रांत आणि शेजाऱ देश. यांच्या बद्दलचे कर्तव्य म्हणजे शेजाऱ धर्म होय.

 सहा — कौटोम्बीक धर्म. म्हणजे आई बाप, पत्नी मुले, भाऊ बहिणी, चुलते पुतने यांचेबद्दलचे कर्तव्य म्हणजे कौतुबिक जबाबदारी स्वीकारून ती पार पाडणे म्हणजेच कौतुबिक कर्तव्य हा धर्मच होय.

सात — नाती जपून ठेवा, अंधार फार झाला. नाते नाही जपले तर संसारात अंधाराच अंधार होईल, म्हणून कुटुंबा व्यतिरिक्त कुटुंबियांना संबंधित दूरची जवळची सर्वांच सोयरे धायरे आणि दोस्त मित्र मग ते कोणत्याही जाती धर्माची पंथची असोत ती जपली पाहिजेत, याचा अर्थ त्यांचे संबंधित आपले जे कर्तव्य आणि प्रगतीशील परंपरा रितरिवाज आहेत त्या पाळणे आवास्याक आहे.

       अशा प्रकारे धर्माची व्याख्या आणि धर्माचे प्रकार आहेत. यातील परलौकिक धर्म हा असत्य, आतार्किक आणि अ अनुभवीक आहे, म्हणून परलौकिक धर्म हा धर्म होऊ शकत नाही. मात्र लौकिक धर्म म्हणजे इहलोकीचा धर्म हा धर्म होऊ शकतो. कारण हा धर्म अनुभव तर्क, प्रयोग, कृती, या कसोट्यावर टिकतो, म्हणून हा सत्य धर्म आहे. आणि पार लोकिक धर्म हा असत्य खोटा, काल्पनिक, भ्रमिस्ट, स्वप्नाळू धर्म होय.

      इथे धर्माची आवास्याकता आहे कीं नाही? हा विषययाचे चिंतन मांडले नाही. तो एक स्वतंत्र चिंतानाचा विषय आहे. आस्तिक नास्तिक चा तो विषय आहे. आस्तिक लोक इहलोकीच्या धर्मास सुद्धा धर्म मानीत नाहीत, ती फक्त ईश्वरांशी आणि आत्म्याशी संबंधित धर्मासच धर्म मानतात.

     नास्तिक तर कोणताच धर्म मानीत नाहीत, ते फक्त नैतिकता हाच धर्म मानतात, पण त्यास धर्म न म्हणता माणसाची नैतिकता असेच म्हणतात, आणि ही नैतिकता स्थळ काळ परिस्थितीनुसार माणूस गरज म्हणून बदलत असतो, तसेच नौतिकता ही व्यवस्थेवर अवलंबून असतें. व्यवस्था बदलली कीं अवस्था बदलते त्यानुसार परिस्थिती बदलते, म्हणून नैतिकता हा धर्म म्हणून पळाला जातो, आणि पाळावा पण त्याची लवचिकता पन पाळल्या जावी, नव्हे माणसाला लवचिक व्हावेच लागते, ती काळाची गरज होऊन बसते. म्हणूनच परिवर्तन ही नित्याचीच बाब होऊन बसते. यास मानवनिर्मित धर्म असे म्हणतात. असे नास्तिक तत्वज्ञान सांगते.

     थोडक्यात सांगायचे झाल्यास भौतिक विषमता आणि भौतिक समता याचे प्रमानानुसार धर्माचे टिकणे न तिकणे अवलंबून असतें. नैतिकतेचा धर्म मात्र समातेच्या व्यवस्थेत आणि वातावरणात टिकतो याची दाट शक्यता आहे.

        लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 25 डिसेंबर 2025. फोन : 9420912209.