Home Vidarbha वाघाच्या वाढत्या दहशतीने शेतकरी झाले भयंकर त्रस्त… — भाजप चिमूर मंडळ...

वाघाच्या वाढत्या दहशतीने शेतकरी झाले भयंकर त्रस्त… — भाजप चिमूर मंडळ अध्यक्ष गजानन गुळधे यांनी घेतली शेतकऱ्यांच्या परेशानीची दखल.. — शेतशिवारात वाढणार वनपाल व वनरक्षकांची गस्त…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी… 

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सातारा,मौजा बाम्हणगांव शेतशिवारात वाघाच्या वाढत्या दहशतिने शेतकरी वर्ग त्रस्त झाले असून याची दखल भाजप चिमूर मंडळ अध्यक्ष तथा सरपंच गजानन गुळधे यांनी घेतली.

              त्यांनी बामणगाव येथे जाऊन शेतकऱ्यांशी सवांद साधला आणि वनाधिकारी रेड्डी सोबत भ्रमणध्वनी वरून सातारा,बामणगाव शेतशिवारात वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढविण्याची मागणी केली.

             वनाधिकारी रेड्डी यांनी गस्त वाढवून दिली असून गस्त कर्मचारी शेतशिवारात फिरणार आहेत.एखाद्या घटना अंतर्गत तात्काळ धावून जाणारे सरपंच गजानन गुळधे यांच्याबद्दल दोन्ही गावातील शेतकरी,शेतमजूर यांनी सहानुभूती दर्शविली आहे.