Home Social शंकरपूर ग्रामपंचायतच्या,”सरपंच भाऊबीज,योजनातंर्गत 629 महीला भगींनी ठरल्यात लाभाच्या मानकरी.. — पुणे...

शंकरपूर ग्रामपंचायतच्या,”सरपंच भाऊबीज,योजनातंर्गत 629 महीला भगींनी ठरल्यात लाभाच्या मानकरी.. — पुणे येथील बाल किर्तनकारांनी केले समाज प्रबोधन,इतरांना प्रोत्साहनपर बक्षीस….

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर ग्रामपंचायत येथे,”सरपंचभाऊ भाऊबीज,ही नाविन्यपूर्ण योजना ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा अमलात आणली.

          ही नावाजलेली योजना शंकरपूर ग्रामपंचायतने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा,”सरपंच भाऊबीज,योजना अमलात आणली असून या योजना अंतर्गत सहाशे एकोणवीस लाभार्थी महिला भगिनींना मानधनाचे वाटप करण्यात आले.

       भाऊबीजेच्या दिवशी गुजरी चौकात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ.सतीश वारजुकर यांच्या हस्ते करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खनिकर्म विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर हे होते.

        तर प्रमुख पाहुणे म्हणून चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक,सरपंच साईश वारजुकर,उपसरपंच अशोक चौधरी,विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष भाऊराव बावनकर,उपाध्यक्ष दुर्योधन तांबरभोगे,मनिषा मून,धनराज मुन,ग्रामपंचायत सदस्य सविता चौधरी,नितीन सावरकर,निखिल गायकवाड,रंजना उइके,बेबी डहारे,वंदना सहारे,गोकुल सावरकर,पिंटू शेरकी,सचिन रासेकर,राम शेरकी आदी मान्यवर उपस्थित होते.

        या कार्यक्रमात १४७ विधवा महिला,४५ अपंग महिला, ६५ वर्षावरील वरील ४१७ महिलांना पाचशे रुपये रोख स्वरूपात मानधन देण्यात आले.

          या कार्यक्रमाचे संचालन विजय गजबे यांनी केले तर कार्यक्रमाच्या वास्तविकतेचे प्रास्ताविक आमोद गौरकर यांनी केले व त्यांनीच उपस्थितांचे आभार मानले.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम अधिकारी केशव गजभे,ग्रामपंचायत कर्मचारी सादिक शेख,रवींद्र राखडे,बाळा ढोक,सचिन निकुरे,राजू बघेल यांनी परिश्रम घेतले.

         याच कार्यक्रमात गावकऱ्यांना कीर्तनस्वरूपी ज्ञान देण्यासाठी पुण्याहून बाल कीर्तनकार ह.भ.प.माऊली महाराज जऊळकर यांचे कीर्तन ठेवलेले होते.या बाल कीर्तनकाराणे आपल्या वाणी द्वारे लोकांचे लक्ष वेधून घेतलेले होते.

           तद्वतच वसुंधरा योजने अंतर्गत घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली होती.त्यात प्रथम बक्षीस नरेंद्र आदमाने,द्वितीय बक्षीस निकिता शहारे,तृतीय बक्षीस वैष्णवी पकडून यांना देण्यात आले तर प्रोत्साहनपर बक्षीस महादेव शेरकी,सारिका समर्थ यांना देण्यात आले…