देहू संस्थांचे माजी अध्यक्ष श्री गुरु बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या 65 वा अभिष्टचिंतन सोहळा हा लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमध्ये संपन्न होणार… — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार व अनेक आजी, माजी, आमदारांची व लाखो भाविक वारकऱ्यांची उपस्थिती…

  बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

          नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीमध्ये श्री गुरु बापूसाहेब देहूकर महाराज यांचा 65 वा अभिष्ठनचिंतन सोहळा साजरा होणार आसून या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय गाथा भजन सोहळा रविवारी दिनांक. 29 /10 /2023 ते रविवार दिनांक 5 /11/2023 या कालावधी मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

          देहू संस्थांचे अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज मळोली तालुका माळशिरस यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवून, देहूकर फडावरील सर्व वारकरी आणि सप्ताह कमिटी नीरा नरसिंहपूर यांच्या माध्यमातून शंभरहून आनेक गावांचा यामध्ये समावेश आहे.अतिशय भव्य व दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची आठ दिवस संपूर्ण सांगता नरसिंहपूर येथील एसटी स्टँड समोर होणार आहे.

        जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज देहू संस्थानचे माजी अध्यक्ष व देहुकर फडाचे मालक श्री गुरु बापूसाहेब देहुकर महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी राजे महाराजे आनेक मान्यवर व पदाधिकारी उपमुख्यमंत्री , खासदार ,आमदार, आजी-माजी आमदार संत, महंत, सर्व संस्थांचे सर्वच पदाधिकारी व भाविक, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, या तीन जिल्ह्यातून मोठ्या संख्येने वारकरी भाविक उपस्थितीत राहणार आहेत, रविवारी दिनांक 29 /10 /2023 रोजी एमआयटी कॉलेज अध्यक्ष विश्वनाथ कराड सर हे पहिल्या दिवशी उपस्थितीत राहणार आसुन त्याच दिवशी सकाळी तुकाराम महाराज ग्रंथाचे पूजन करून सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.

          उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार राजे छत्रपती संभाजी महाराज उपस्थित राहणार आहेत. रविवारी दिनांक 5/ 11/2023 रोजी सप्ताहाचा मुख्य कार्यक्रम म्हणजे श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांचा अभिष्टचिंतन व सन्मान आणि काल्याचे कीर्तन होणार आहे.

          यासाठी विद्यमान आमदार तथा माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, आमदार यशवंत माने, आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार संजय मामा शिंदे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष धवल सिंह मोहिते पाटील , माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे , अभिजीत पाटील, माजी सभापती प्रवीणभया माने…

        आळंदी येथील शांती ब्रह्म कुरेकर बाबा, तसेच पंढरपूर येथील सर्व फडकरी महाराज मंडळी, सर्व संतांचे वंशज, देहू संस्थान, आळंदी संस्थान, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समिती, संत सोपान काका संस्थान सासवड, लक्ष्मी नरसिंह देवस्थान सर्व विश्वस्त तसेच सर्वच भागातील भाविक व ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

         या सर्वांच्या उपस्थितीत गुरुवर्य बापूसाहेब देहुकर महाराज यांचा 65 वा अभिष्टचिंतन सोहळा होणार आसल्याचे. अखंड हरिनाम सप्ताह कमिटी श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर यांच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.

           सप्ताहासाठी प्रत्येक दिवसाला हजारो लोकांना आन्नदान सेवा व एक हजार टाळकरी आणि विणेकरी, मृदुंग वादक, सह रोज हजारो भाविक व श्रोते या लक्ष्मी नरसिंहपुर पावन भूमीमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थितीत राहणार आहे. लांबून येणाऱ्या भाविकांना मुक्कामासाठी राहण्याची सोयही केलेली आहे या सर्वांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात महा प्रसादाची व्यवस्थाही केली आहे.

          तसेच हजारो संख्येने भाविकांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.शेवटी श्री गुरु बापूसाहेब महाराज देहुकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अभिष्टचिंतन सोहळ्याची सांगता झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.