महिला व मुलींच्या आत्मरक्षणासाठी युवारंग तर्फे निशुल्क कराटे प्रशिक्षण.. — विद्यार्थी व विद्यार्थिनीनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा :- राजुजी घाटूरकर मुख्य कराटे प्रशिक्षक…

प्रितम जनबंधु

  संपादक

        आरमोरी :- नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, उद्योग क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम घेणाऱ्या युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप, आरमोरी तर्फे महिला व मुलींवरील होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी सातत्याने मागील 6 वर्षांपासून निशुल्क कराटे प्रशिक्षणाचे आयोजन आरमोरी शहरात केल्या जात आहे.

             आतापर्यंत या प्रशिक्षणातून १००० मुली व महिला तर ५०० मुलांनी प्रशिक्षण घेतले आहे दि. २९ /१०/२०२३ रोज रविवार पासून २०२३ या वर्षातील कराटे प्रशिक्षणाची सुरवात होणार आहे.

          ज्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पंच, किक, काता, शत्रूपासून स्वताचा बचाव करणे, अती कठीण प्रसंगात शत्रुवर आक्रमण करणे, या बदल माहिती दिली जाईल तरी जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या प्राशीक्षणामध्ये सहभाग घ्यावा कराटे प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी 9834884960, 9834169950 या क्रमांकावर किवा लोकप्रिय रणजित फोटो स्टुडिओ, टी पॉईंट बर्डी येथे संपर्क करावा असे आवाहन युवारंग तर्फे करण्यात आलेले आहे.