Home कृषी साथी पोर्टल बाबत एक दिवसीय प्रशिक्षण व रबी हगांम पूर्व प्रशिक्षण संपन्न...

साथी पोर्टल बाबत एक दिवसीय प्रशिक्षण व रबी हगांम पूर्व प्रशिक्षण संपन्न … — तालुका कृषी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आले प्रशिक्षण शिबीर…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारसिवनी 

          पारशिवनी :- तालुका कृषी विभागातील कार्यालया मार्फत पारशिवणी तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे बियाणे विक्री साठी उपयोगात येणारा,”साथी पोर्टल,बाबत एक दिवसीय प्रशिक्षण व रबी हगांम पूर्व प्रशिक्षण तालुका कृषी कार्यालय चे सभागृहात पार पडले. 

           तालुका कृषी अधिकारी राकेश वशु यानी दिलेल्या माहिती नुसार पारशिवनी येथे एक दिवसीय प्रशिक्षणास माहिती देण्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून श्री.चंद्रशेखर कोल्हे तंत्र अधिकारी,गुण नियंत्रण वि.कृ.स.स.नागपूर विभाग नागपूर व श्री.संदीप पवार गुण नियंत्रण अधिकारी,वि.कृ.स.स.नागपूर विभाग नागपूर यांना बोलावले होते.त्यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले.

          यावेळी श्री.राकेश वसू तालुका कृषी अधिकारी पारशिवनी व पारशिवनी तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते प्रामुख्याने उपस्थित होते.

       एक दिवसिय प्रशिक्षणाचे आयोजन पारशिवनी कृषी विभागाचे श्री.सचिन कुबडे कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) पारशिवनी यांनी आयोजन केले होते.