रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चंद्रपूर :- शिक्षणात आणि सामाजिक कामात नवनवीन प्रयोग करणारे व उपक्रम राबविणारे स्वामी विवेकानंद आश्रमशाळा किरमिरी येथील शिक्षक प्रमोद साळवे यांनी आपला वाढदिवस डेबू सावली वृद्धाश्रम चंद्रपूर येथे साजरा केला.
आपल्या कामाचा कधीही गाजावाजा न करता आपला वाढदिवस नेहमी सेवेतून साजरा केला जावा अशा हेतूने आपल्या आई वडिलांच्या वयातील वृद्ध माता पित्यासोबत अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. त्यांच्यासोबत आई ,काका व त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.
सरांची कार्यपद्धती व सेवाभाव बाबत सांगताना मोहनदास मेश्राम सर यांनी सांगितले की तळागाळातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून जी सेवा देतात व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सतत प्रयत्नशील असतात. तसेच श्री. गोपाल बोबाटे सर यांचा देखील वाढदिवस साजरा करण्यात आला.
श्री.चंद्रभान वरारकर सर यांनी सांगितले आमचे भाग्य आहे की आम्हाला आपल्या सारख्या माता पित्याना भेटण्याची संधी मिळाली व माझा वाढदिवस मी इथेच साजरा करणार. तसेच श्री.बजरंग जेणेकर सर म्हणाले की नेहमी आम्ही ज्यांना गरज असेल अशा लोकांची सेवा करू त्यात आपण आहात आम्हाला गाडगे महाराजांचं कामाचा वारसा घेऊन चालणारे सेवाभावी संस्था भेटण्याचे भाग्य लाभले.
सोबत प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथील लेखाधिकारी श्री. जगताप साहेब, सहाय्यक लेखाधिकारी श्री.पाटील साहेब व आश्रमशाळा परिवारातील राहुल ब्रह्मपुरीकर,गोपाल बोबाटे सर, निलेश देठे सर, मनोज आत्राम सर उपस्थित होते.



