पीपल्स रिपब्लिकन पार्टीला एकजुटीची ताकद द्या.:-चरणदास इंगोले यांचे आवाहन! 

 

युवराज डोंगरे/खल्लार

       माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी द्वारा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या गाव भेट अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पक्ष बांधणीच्या दृष्टीने चलो हर गाव ही संकल्पना घेऊन गाव भेट अभियाना अंतर्गत दिनांक 23 ऑगस्ट 2023 बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता चरणदास इंगोले यांनी अचलपूर तालुक्यातील सांगवी( दोनोडा) या गावी भेट दिली.

      या भेटीदरम्यान सर्वप्रथम आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या गावातील तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर समाज बांधवांशी संवाद साधताना चरणदास इंगोले म्हणाले की डॉ.बाबासाहेबांचा रिपब्लिकन राजकीय विचार घेऊन जगताप असतानाच रिपब्लिकन विचार देखील जगला पाहिजे यासाठी आपण सर्वजण धडपड करीत असतो ही अभिमानाची बाब आहे .

       डॉ.बाबासाहेबांच्या गोरगरीब समाजाला आजही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे अशावेळी समस्याग्रस्तांना सर्व अर्थाने आधार देण्याचं काम पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे.त्यामुळे प्रा. जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीला समाज बांधवांची ताकद लाभत असल्याचे सांगून भविष्यात आपल्या राजकीय ध्येयपूर्ती करिता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सभासद बनून पार्टीला आपल्या एकजुटीचे बळ द्यावे असे आवाहन चरणदास इंगोले यांनी या गाव भेट अभियानांच्या माध्यमातून सांगवी येथील समाज बांधवांना केले.

        यावेळी जिल्हा महासचिव गंगाधर खडसे सांगवी ग्रामपंचायत सदस्य कैलास मोहोड, सुधाकर तायडे, महेंद्र तायडे, विठ्ठलराव तायडे, समाधान चव्हाण, गजानन तायडे ,संदीप भालेराव ,प्रतीक मोहोड या सह बरेच जण उपस्थित होते .