बामसेफ व राष्ट्रीय मुलनिवासी संघाचे ३७ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन -२०२३ परभणी येथे होणार…..

ऋषी सहारे

संपादक

 

    वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष बामसेफ) यांच्या अध्यक्षतेखाली बामसेफ व राष्ट्रीय मुलनिवासी संघाचे ३७ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन दि-२७ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ ते रात्री ९.३० पर्यंत होईल.हे अधिवेशन लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, रेल्वेस्टेशन समोर, परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे.

   छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास नाहीत. हा ऐतिहासिक निकाल देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश टी.व्ही.नलावडे हे उद्घाटक असतील.

    या अधिवेशनाचे प्रदीप पोळ (उपायुक्त आदिवासी विकास प्रकल्प विभाग,ठाणे),एम.एम.कोटुले (निवृत्त मुख्य कार्यकारी अभियंता,महाजनको),विद्याधर माणगावकर (कामगार अधिकारी,परभणी),जयंत सोनवणे (उपायुक्त महानगरपालिका,परभणी), व एस.आर.बर्गे (प्रशासन अधिकारी,उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य) हे प्रमुख अतिथी असतील.

     या अधिवेशनात तीन सत्रांमध्ये बहुजन समाजाच्या निगडित ९ वेगवेगळ्या विषयांवर महाराष्ट्रातील १४ नामांकित विद्वान,विचारवंत प्रबोधन करणार आहेत.

 

या विषयांवर होईल प्रबोधन

१)२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतील VVPT स्लिप ४ महिन्यात का नष्ट केल्या?

२)EVM ची भुमिका व निवडणुक आयोगाद्वारा लोकशाहीचे मुल्य नष्ट करणे एक षडयंत्र

३)जर ओबीसी हिंदु आहेत तर शासक ब्राम्हण वर्ग ओबीसीची जातीनिहाय जनगणनेचा विरोध का करतात?

४) छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास नाही-मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

५)समान नागरी संहितेद्वारे (UCC) आदिवासींचा कस्टमरी लॉ समाप्त होणे,

एस.सी.एस.टी.ओबीसी व धार्मिक अल्पसंख्याक लोकांवर हिंदुच्या नावावर ब्राम्हण धर्म थोपवणे हे एक षडयंत्रकारी अभियान आहे. अशा व इतर गंभीर विषयांवर प्रबोधन होणार आहे.  

   उद्घाटन सत्र -१

हे सकाळी १२ ते २ पर्यंत आहे.

      चर्चा सत्र-२

दुसरे सत्र दुपारी ३ ते ५ पर्यंत होईल.

      चर्चा सत्र-३

तिसरे चर्चासत्र सायं. ६ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत चालेल.

 

बहुजन समाजाला आवाहन–

   परभणी येथे होणा-या अधिवेशनास ,आपल्या समस्या व त्यावरील उपाय ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील बहुजन समाजातील सर्व बंधु व भगिनींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन गोरखनाथ वेताळ (महाराष्ट्र राज्य प्रभारी, बामसेफ),मंगला थोरात(महाराष्ट्र प्रदेश प्रभारी पुर्ण कालीन प्रचारक योजना),अभिजित भगत (महाराष्ट्र राज्याध्यक्ष बामसेफ) व सुमित्र अहिरे( राज्य कार्याध्यक्ष बामसेफ) यांनी बहुजन समाजाने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.