Home Social चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा शिवसेना व युवासेनेच्या...

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा शिवसेना व युवासेनेच्या वतीने सत्कार!..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी…

        शिवसेना व युवासेना चंद्रपूर यांच्या वतीने रवींद्र शिंदे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

         शिंदे यांची नुकतीच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

           सहकार क्षेत्रातील त्यांच्या उत्तम नेतृत्वामुळे व प्रभावी कार्यशैलीमुळे सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. हे येथे उल्लेखनीय आहे.

         शिवसेना व युवासेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला विश्वास आणि कार्यक्षमतेचा आदर्श पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

          या प्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख आलेख रट्टे, शिवसैनिक सुरज शाहा, युवा शिवसैनिक सुमित हस्तक, निखिल मांडवकर, भूषण जाधव, हर्षल खंगार आदिं उपस्थित होते.