निरा नरसिंहपुर येथे रंगला निकाली कुस्त्याचा आकडा… — अकराशेहून अधिक कुस्ती मल्ल पैलवानांची उपस्थिती… — लक्ष्मी नरसिंह जयंतीचे आवचित्य साधून कुस्ती मैंदानामध्ये 550 हुन अधिक निकाली कुस्त्या लावण्यात आल्या…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे लक्ष्मी नरसिंह नवरात्र उत्सवा निमित्त निकाली कुस्त्याचा आकाडा भरविण्यात आला.

           दुपारी 2 वाजता कुस्ती आखाड्याचे पूजन करून निकाली कुस्त्याला प्रारंभ झाला. 

         या मैंदानात एक नंबरच्या कुस्तीमध्ये पैलवान सतपाल सोनटक्के याला चित्रपट करून पैलवान राहुल सुळ याने विजय मिळवला. तर दोन नंबरची कुस्ती बरोबरने सोडण्यात आली.

         राज्य व राज्याबाहेरून आनेक कुस्ती मल्ल पैंलवान व प्रेक्षक 5 हजाराहून अधिक संख्येने उपस्थित होते. 

          नामांकित आलेल्या पैलवानांचा व प्रमुख नेते मंडळींचाही यात्रा कमिटीच्या वतीने आखाड्या मध्ये सन्मान करण्यात आला. 

          कुस्ती मैदानामध्ये 50 (पन्नास )रुपये पासून ते 1 (एक लाख) रुपये इनाम पर्यंतच्या निकाली कुस्त्या लावण्यात आल्या. या आखाड्यामध्ये कुस्त्या जोडण्याचे काम, महाराष्ट्र चॅम्पियन कुस्ती सम्राट पैंलवान रावसाहेब (आपा)मगर कुस्ती निवेदक युवराज केचे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          माजी सरपंच विठ्ठल देशमुख, आरुण क्षीरसागर, प्रशांत बादले,माजी सरपंच नराभाऊ काळे, माजी सरपंच आण्णासाहेब काळे, माजी सरपंच संतोष मोरे, माजी सरपंच विलास ताटे, माजी सरपंच जगदिश सुतार, नरसिंहपूरचे वस्ताद सचिन कदम , उद्योजक विजय सरवदे, सरपंच नितीन सरवदे, उपसरपंच गुरुदत्त गोसावी,उद्योजक संतोष क्षिरसागर, डॉ. गणेश केसकर, अध्यक्ष दशरथ राऊत, माजी उपसरपंच आनंद काकडे, माजी सरपंच चंद्रकांत सरवदे यांनी गेली पंधरा वर्षापासून कुस्ती आखाड्याची परंपरा टिकवली.

         सरपंच उपसरपंच आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सर्वच ग्रामस्थ यांच्या संयुक्त पुढाकाराने निकाली कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. 

           सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, आशा आनेक जिल्ह्यातून नामांकित कुस्तीमल्ल पैलवानांची हजारोच्या संख्येने नरसिंहपूर येथे उपस्थित होते,

          निकाली कुस्त्याच्या निवेदनासाठी, संपूर्ण राज्यामध्ये ओळख निर्माण झालेले पैंलवान युवराज (तात्या) केचे यांची या कुस्ती आखाड्यासाठी प्रमुख निवेदक म्हणून उपस्थित आहे.