होळीनिमित्त सावली वनपरिक्षेत्रात विशेष गस्त…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

           चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र हे भौगोलिक दृष्ट्या क्षेत्रफळाने जास्त असून विविध प्रजातीच्या घनदाट जंगलांनी, वन्य पशु, पक्षी, प्राण्यांचा वावर आहे. सावली वनपरिक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वल, रानगवा रानटी डुक्कर, नीलगाय, चित्तल, सांबर, भेकर, ससा, घोरपड इत्यादी वन्य प्राण्यांनी समृद्ध म्हणून सावली तालुका ओळखला जातो. 

             ग्रामीण भागात शिकाऱ्यांची संख्या जास्त असल्याने वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये म्हणून दरवर्षी होळी, पोळा, दिवाळीनिमित्त वनक्षेत्रात, संवेदनशील गाव शिवारात दिवस पाळी व रात्रपाळीत फिरती केल्या जाते. त्यामुळे वन्य प्राण्यांचे शिकारीवर आळा घातला जातो. 

           या गस्ती कार्यक्रमाव्यतिरिक्तही सावली वनपरिक्षेत्राला लाभलेले नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.सी. धुर्वेयांनी शिकारी, अवैध वृक्षतोड व वाहतूक तसेच वन जमिनीवरील अतिक्रमण, अवैध उत्खनन, रेती तस्करांच्या चांगल्याच मुस्क्या आवळल्या आहेत.