Home देशविदेश एक ऐतिहासिक बैठक…. — निमित्त ऍड.अनिल मिश्रा याचे बाबासाहेब आणि संविधान...

एक ऐतिहासिक बैठक…. — निमित्त ऍड.अनिल मिश्रा याचे बाबासाहेब आणि संविधान या बद्दलचे बेताल वक्तव्य….

       दिनांक 22 ऑक्टोबर 2025 दीपावलीच्या दिवशी प्रा. डॉ.अनंत राऊत यांच्या परिपत्रकानुसार आणि आवाहनानुसार सरांच्याच निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली.

        सायंकाळी 4.00 वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल तीन तास चालली.या बैठकीस पक्ष संघटना आणि सामाजिक संघटनांचे मिळून एकूण 75 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

        विषय होता,मनुवादी विचारांचे लोक सत्तेत आल्यापासून आरएसएस चे लोक बेताल वक्तव्य जाहीर सभेतून व मिडियापुढे वक्तव्य करीत आहेत.

       आता तर चक्क सुप्रीमकोर्ट चे मुख्य न्यायाधीशाला बूट फेकून मारण्या पर्यंत मजल गेली आहे.याचा अर्थ आम्ही ही न्याय व्यवस्था,लोकशाही,संविधान,डॉ.बाबासाहेब आंबेडकर इत्यादी कुणालाच मानत नाही.ज्यास जे करायचे ते करा.असे चॅलेंज परिवर्तन क्रांतिकारी समाजाला,विचाराला देत आहेत.

         सत्तेचा गैरवापर करून संविधानिक स्वायत्त संस्थांवर कब्जा केला आहे.सर्व बहुजनांच्या आमदार खासदारांना आपल्या ताटाखालचे मांजर बनविले आहे.याचा अर्थ प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे.

         अशावेळी आपण परिवर्तनवादी,क्रांतिकारी पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी मूळ गिळून गप्प राहता कामा नये.संविधानचे संरक्षण करण्याची ही वेळ आहे,यासाठी आपण एकत्र येऊन कृती कार्यक्रम करूया.अशा प्रकारचे मार्गदर्शन राऊत सरांनी केले आणि यावर खुली चर्चा झाली,यात अनेकांनी आपापली मते थोडक्यात मांडली तसेच कृती कार्यक्रम पण दिला. 

  यात मी पुढील प्रमाणे कृती कार्यक्रम दिला…..

     याच बैठकीत संविधान संरक्षण कृती समितीची घोषणा करण्यात यावी आणि संविधानाचे संरक्षण करण्यासाठी पुढील पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यात यावा. 

पंचसूत्री कार्यक्रम असा….

 1. आपापसातील मतभेद विसरून सर्व पक्षप्रमुख पक्ष संघटना आणि सामाजिक संस्था आणि संघटना यांनी म्हणजेच संविधानवादी लोकशाहीवादी आणि बाबासाहेबांच्या विचारावर निष्ठा असणाऱ्यांनी आधी एकत्र आले पाहिजे,म्हणजेच एकी करणे ही काळाची गरज आहे. 

2. शत्रु पक्ष हा आता केवळ टीका नव्हे तर एक वैचारिक संघर्ष म्हणून मांडणी करतो आहे.यासाठी आपणही त्यांची मते खोडण्यासाठी वैचारिक संघर्ष केला पाहिजे. 

3. कायदेशीर लढाई लढली पाहिजे.उदाहरणार्थ ते जे काही बेताल वक्तव्य करतील किंवा संविधानाच्या विरोधात काही कृत्य करतील मग ते लोकप्रतिनिधी असो की त्यांचे कार्यकर्ते असो किंवा कोणीही असो त्यांच्या विरोधात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देणे,पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही करणे,न्यायालयीन लढाई लढणे. 

4. रस्त्यावरची लढाई लढणे.उदाहरणार्थ मोर्चे काढणे,निदर्शने करणे,धरणे धरणे,जेल भरो आंदोलन इत्यादी आपण जनतेच्या प्रश्नावर नेहमीच जे करत असतो ते केले पाहिजे. 

5. राजकीय लढाई लढणे,आपल्यातील बरेच जण सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा या गोष्टीला महत्त्व देऊन असंघटित झालो आहोत,जाती आणि धर्माच्या लढाईमध्ये सहभागी होत आहोत,त्याचा फायदा मनोवादी संस्था संघटना पक्ष घेत आहेत,आपण 85% बहुजन आणि समतावादी असू नये केवळ 15% अभिजन लोक म्हणजे विषमतावादी शक्ती आज सत्तेवर आहे,याचे कारण आपणास झालेला सत्तेचा,धनाचा आणि प्रतिष्ठेचा मोह.हा बाजूला ठेवून कोणत्याही परिस्थितीत मनुवादी विचाराचे लोक सत्तेत येता कामा नये आणि बहुजनांचीच सत्ता असली पाहिजे यासाठी काहीतरी व्युव्हरचना करण्याची ही वेळ आहे,सत्तेत राहण्याची व्युव्हरचना केल्याशिवाय आपण कितीही आंदोलने केली तरीही ते चिरडून टाकणार आहेत.

           म्हणून सत्तेचे राजकारण हे बहुजनाचे राजकारण झाले पाहिजे.यासाठी गौतम बुद्धांच्या विचारानुसार मोहटाळला पाहिजे.तरच हे शक्य आहे.

         संविधान वादी पक्षांची युती अत्यंत महत्त्वाची आहे,कारण ही लढाई केवळ सत्तेची नसून ही लढाई आहे मनुस्मृती विरुद्ध संविधानाची.

        संविधान जिवंत ठेवायचे असेल आणि मनुस्मृतीला डोके वर काढू द्यायचे नसेल तर राजकीय आघाडी अत्यंत महत्त्वाचे आहे. 

               ज्याच्या हाती सत्ता त्याचीच मत्ता!,म्हणजे पोलीस,मिलिटरी आणि शासकीय यंत्रणा त्यांचेच हाती असते म्हणून ते त्यांचे विचार राबविण्यासाठी सोपे होते.हे माहीत असूनही केवळ सत्तेसाठी आपण एकत्र यायला तयार नाही परिणामी सत्ता आपल्या हाती लागत नाही.

         2024 पासूनचा हा आपला अनुभव आहे.म्हणून आता तरी जागे झाले पाहिजे.”वाढीसाठी हल्ल्या कापणे कधीही हिताचे नसते तर ते आपल्या नुकसानीचेच असते हे जुन्या लोकांचे तत्त्वज्ञान आपण अंगीकारले पाहिजे. 

   या बैठकीचे निष्कर्ष: 

1.संविधान संरक्षण संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली.

2.सहयोग नगर येथील बुद्ध विहार मैदानात,जिल्हा पातळीवर एक व्यापक बैठक दिनांक 10 नोहेंबर रोजी घेऊन त्यात संविधान महाक्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात यावे,आणि संविधान संरक्षण स्थायी समिती जाहीर करून मान्यता घ्यावी,असे ठरले.

       एकंदरीत प्रदीर्घ खुल्या चर्चेतून आशादायी चित्र निर्माण झाले.ही जमेची बाजू.

          दत्ताभाऊ तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

                 फोन : 9420912209.