सहयोग नगरातील नाली तुडुंब भरल्याने आजारास निमंत्रण, दर्यापूर न.प. ने लक्ष देणे गरजेचे…

युवराज डोंगरे/खल्लार

     उपसंपादक

             दर्यापूर नगर परिषद क्षेत्रातील शहराच्या मध्यभागी सांगळुदकर नगरला लागूनच सहयोग नगर आहे. या दोन नगराच्या मधात 10 फुट सर्व्हिस गल्ली आहे त्याधून नाली गेली असून या दोन नगरामधून गेलेली नाली तुडुंब भरली असल्याने रोगराई निमंत्रण दिल्या जात असून याकडे नगर परिषदेने लक्ष देणे गरजेचे आहे.

         या सर्व्हिस गल्लीमध्ये काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नाली उपसल्या जात नाही असे न प प्रशासनाकडून सांगण्यात येते.नागरिकांना अतिक्रमण करु न देता किंवा केलेले अतिक्रमण काढणे ही न.प.ची जबाबदारी आहे. मात्र अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यापलीकडे न.प. काहीही करीत नाही.

           न. प. नाली बांधली तेव्हापासून उतार न काढल्यामुळे नालीचे पाणी पुढेच जात नाही. परिणामी नाली तुडुंब भरते.

           एकीकडे न. प. ने नविन नाली बांधकामाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे तर दुसरीकडे नाल्या तुडुंब भरल्या आहेत.

            जोपर्यंत ही नाली उपसता येते तोपर्यंत उपसण्यात यावी जेणेकरुन काही प्रमाणात नाली मोकळी होईल व आजारास आळा बसेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.