तरुणाच्या हत्या प्रकरणी निषेध मोर्चा… — कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र होणार…

ऋषी सहारे

संपादक

 

 गडचिरोली _ लोकस्वराज्य जण आंदोलन तर्फे RPI च्या विविध पाटर्या व संघटनेच्या वतीने जिवती तालुक्यातील फाटागुड्डा येथील जिवन तोगरे व टेकामाडवा येथील संतोष शिंदे या दोन दलीत मित्रांना त्यांच्या गावातीलच संवर्ग जातीच्या मारेक-यांनी फोन वर बोलावून जंगलात व शिवारात एका महिन्याच्या अंतराने जिवंत ठार मारले. सदर प्रकरणाची त्यांच्या कुटुंबियांनी रिपोर्ट देऊनही टेकामाडवा व जिवती ठाणेदारांनी थातुरमातूर चौकशी करून मारेकर्यांना मोकाट सोडले त्यामुळे तब्बल एक महिना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कार्यालया समोर उपोषण करण्यात आले परंतु तोगरे व शिंदे कुटुंबियांना न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे दि. २४ ऑगष्टला जिवती तालुका तहसिल कार्यालयावर प्रचंड एल्गार मोर्चा रिपब्लिकन पार्टी चे चंद्रपूर जिल्ह्यध्यक्ष गोपाल रायपूरे ,Brs चे समय्या पसुला, अँड . दत्तराज गायकवाड, RPI नेत्या प्रियाताई खांडे , रिपाईचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर, भागवत मोरे, प्रा. नक्कलवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून _ तोगरे व शिंदे या दलीत तरुणाच्या मारेकऱ्याना त्वरीत पकडून मारेकर्‍याना फाशीची शिक्षा घ्यावी, अॅक्ट्रोशिटी अर्तगत गुन्हा नोंदवावा या मागणीचे निवेदन जिवती तहसिलदार अविनाश शेंबटवाड, ठाणेदार रामटेके जिवती यांना मोर्च्यातील जननेती निवेदन दिले. त्यानंतर तहसिल कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली. या सभेत गोपाल रायपूरे यांनी शासनाला कडक ईशारा दिला की , घटना हि सत्य असुन मारेकराच्या शोध न घेणारे ठाणेदार म्हैसेकर यांना सुद्धा आरोपी करावे. पोलीसांनी मारेकर्‍याच्या शोध घ्यावा अन्यता पूढील आंदोलन तिव्र करण्याचा ईशारा सुद्धा शासनाला देवून महाराष्ट्र शासनाचा व पोलीस अधिकार्यांचा निषेध नोदविला. या सभेत प्रा. मुनिश्चर बोरकर , प्रियाताई खांडे , प्रा. रामचंद्र भंडारे ,अँड दत्तराज गायकवाड , सम्मय्या पसुला , प्रा नल्लमवार, भागवत मोरे आदिनी घटनेचा निषेध नोंदविला. सदर प्रचंड एल्गार मोर्च्यात जिवती तालुक्यातील दलित बांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.