एकोडी (रामटोली) येथील ग्रामवासीयांचे तहसीलदार यांना निवेदन…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले..

 

साकोली -एकोडी (रामनगर) येथील वनहक्क दावे प्रस्ताव निकाली काढून घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा देण्यात यावी या करीता रामनगर वासीय जनता यांनी तहसीलदार कदम,तथा उपविभागीय अधिकारी इंगोले यांना निवेदन दिले.

          महसुल विभागाच्या रेकार्ड नुसार ४३८/१, ४३८/२, येथील सर्व लाभार्थ्यांचा गट क्रमांक असून याच गटामध्ये प्रभा राजकुमार पातोळे यांना वनहक्क पट्टा मिळालेला असून शासकीय घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. 

           त्याच प्रमाणे इतर वन हक्क दावे प्रस्ताव तहसील कार्यालयात मधून चौकशी करून पात्र यादी व अपात्र यादी मधील त्रुटी काढून घरकुल साठी वन हक्क दावे निकाली काढण्यात यावे करिता निवेदन देण्यात आले.

        त्याप्रसंगी निवेदन देतांना ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले , माजी सरपंच अनिरुद्ध समरीत, मनोज कोटांगले, ग्रामपंचायत सदस्य सुकराम बन्सोड, तिर्थानंद बोरकर, एकनाथ कोटांगले, कैलास जांभुळकर, पंकज सोनवाने, सूर्यवंशी उके, देवेंद्र पातोळे, शैलेश भैसारे,संजय शहारे, राहुल मानकर,मधुकर निपाने, जीवन निपाने, गिरीधारी तिडके, विलास भुरे, लक्ष्मीकांत बोरकर, झाशीराम मडावी या प्रसंगी उपस्थित होते.