हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद…   – शिबिरामध्ये 561 रक्त बाटल्यांचे संकलन..

 

नीरा नरसिंहपुर दिनांक: 24

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

     भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व हर्षवर्धन पाटील युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील क्रीडासंकुल या ठिकाणी दि. 24 ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व चष्मे वाटप यांचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक उपस्थित होते.

     राजवर्धन पाटील म्हणाले की,’ राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील अनेक भागात तसेच शाळा महाविद्यालयातून मोठ्या स्वरूपात विविध उपक्रम राबविण्यात आले यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले आहेत. तालुक्यातील आरोग्य संदर्भातील प्रश्नावर सोडवणूक करण्यासाठी हेल्पलाइन नंबर देखील सुरू करण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत.

    यावेळी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते, शहर भाजपचे अध्यक्ष शकील सय्यद, माजी नगरसेवक शेखर पाटील तसेच डॉ.शिवाजी खबाले यांनी मनोगत व्यक्त केले.

   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेंद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने घेत असलेल्या उपक्रमाविषयीची माहिती दिली.

   यावेळी नगरसेवक कैलास कदम,रघुनाथ राऊत,गोरख शिंदे,सागर गाणबोटे,दादा पिसे,अविनाश कोतमिरे, संदीप धनवडे,आकाश कांबळे, योगेश कांबळे,रोहित पाटील,शशिकांत जाधव ,पै. बबलू पठाण,रामभाऊ आसबे,दत्तात्रय पांढरे , महादेव पांढरे ,अमोल इंगळे,प्रेमकुमार जगताप ,प्रशांत गलांडे, बंडा पाटील,अतुल वाघमोडे,मयूर शिंदे, मयूर देवकर,गणेश बागल, आकाश वणवे,गणेश जाधव, ऋषीकेष मोहळकर,निखिल बोराटे,यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी स्मेअर पॅथॉलॉजी लॅबचे शुभम गंगावणे,शिवदीप नर्सिंग होमचे डॉ.शिवाजी खबाले सर त्याचबरोबर डॉ.पांडुरंग बोंगणे शिवशंभो रक्त पेढीचे सर्व कर्मचारी व युवा मोर्चा पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडासंचालक प्रा.भरत भुजबळ यांनी केले.आभार तुषार खराडे यांनी मानले.