शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर नागपूर व्हाया शंकरपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर पंधरा हजार लोकवस्तीचे शंकरपूर हे मोठे बाजारपेठेचे ठिकाण असून गावातील मध्यभागातून हा राज्य महामार्ग जातो. या राज्य महामार्गाला लागून व्यापारी संकुल त्यामध्ये असणारे मोठमोठे व्यापाऱ्यांचे दुकान तसेच काही खाजगी घरे आहेत. या रोडला मोठमोठे खड्डे पडल्याने आणि घरासमोर व दुकानासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शंकरपूर वाशीयांना मोठा त्रास होत आहे. आणि तीन दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसामुळे गावामध्ये साथीचे रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने या रोडच्या नाल्याचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य भावनाताई बावनकर यांनी केली आहे.
दोन वर्षे आधी या रोडवर मोठ मोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. याबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी, रास्ता रोको जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सतीश भाऊ वारजूकर यांचे नेतृत्वात नागरिकांकडून करण्यात आले होते. तेव्हा कुठे दोन वर्षानंतर मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने गावातील राज्य महामार्गाचे काम पूर्ण केले.
परंतु गावामधून रोड उंच झाल्याने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्याचे बांधकाम न केल्यामुळे रोड लगत असलेल्या दुकानांमध्ये व घरांमध्ये पावसाचे पाणी शिरत आहे. आणि चकजाटेपार रोडच्या दोन्ही बाजूला नाल्याचे बांधकाम झाले असल्याने त्या संपूर्ण रोडचे पाणी या राज्य महामार्गाच्या रोडकडे येत असल्याने या राज्य महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पावसाची पाणी जमा होत आहे.
या पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणी खड्डे तसेच खोलगट भाग निर्माण झाला असून रोड लगत नाल्या नसल्याने साचलेले पाणी हे गावाबाहेर निघत नाही. त्यामुळे दुकानांच्या आणि घरांच्या समोर साचलेल्या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. आणि घरांमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. परंतु मागील वर्षी झालेल्या या रोड लगत साचलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या समोर पाणी साचले असल्याने व्यवसाय करणे ही कठीण झाले आहे. या साचलेल्या पाण्यात मोकाट जनावरे बसत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
या आधी सुद्धा याची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाला तोंडी तसेच लेखी स्वरूपात अनेकदा केली होती. परंतु याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होऊन गावात रोगराई पसरली असल्याने गावातील नागरिक हिवताप. डेंगू.मलेरिया यासारख्या साथीच्या रोगाने त्रस्त झाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात अशा रोगांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यावर त्वरित उपाय योजना करणे आवश्यक झाले असल्याने याबाबतची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता चिमूर आपत्ती व्यवस्थापन विभाग तहसील कार्यालय चिमूर आरोग्य अधिकारी उपजिल्हा रुग्णालय चिमूर तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभीड यांना केली असून राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम त्वरित करून आरोग्याच्या दृष्टीने साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन करावे, अशी मागणी भावनाताई बावनकर माजी पंचायत समिती सदस्य यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



