नीरा नदीला पाणी नसल्याने टँकरच्या साह्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आले… — सराटीचा शेवटचा मुक्काम आटोपून तुकाराम महाराज पालखीला सन्मानपूर्वक निरोप…

नीरा नरसिंहपूर दिनांक :24

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

     जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सराटी ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.  

      पालखी सोहळा मोठ्या सहभागाने गजबजला आहे. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम आटोपून पालखीने सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे आज पदार्पण केले. तत्पूर्वी पादुकांना नीरा स्नान टँकरच्या साह्याने घालण्यात आले.

     सराटी मुक्कामी पहाटे चार वाजता काकडा आरती करण्यात आली. त्यानंतर गावकन्यांच्या वतीने पादुकांच्या चार पूजा संपन्न झाल्या. सकाळी सात वाजता देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे, विश्वस्त भानूदास मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे, संजय मोरे, अजित मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीत टँकरच्या साह्याने स्नान घातले.

    त्यानंतर ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत महापूजा व आरतीसाठी सराटीचे प्रतिष्ठित नागरिक अनिलभाऊ नारायणभाऊ कोकाटे, संतोष कोकाटे उपसरपंच, यांच्या हस्ते आरती करण्यात आली. भक्तांच्या व वारकऱ्यांच्या दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये ठेवण्यात आले होते. या आरतीसाठी जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका अध्यक्ष हानुमंत कोकाटे, पंचायत समिती सदस्य प्रदीपमामा जगदाळे बापूसाहेब कोकाटे, महेशकाका जगदाळे, अमरभैया जगदाळे, काकासाहेब जगदाळे, राजेंद्र कुरळे सर, आण्णा कोकाटे, रोहित जगदाळे, भैय्यासाहेब कोकाटे, सुधीर भैय्या कोकाटे, बाबासाहेब कोकाटे, मनोज जगदाळे, सिद्धेश्वर कोकाटे, अंकित गोयल जिल्हा पोलीस अधीक्षक, आनंद भोईटे पोलीस अधीक्षक, गणेश इंगळे डीवायएसपी, श्रीकांत पाटील तहसीलदार, पवार साहेब पीआय इंदापूर, नागनाथ पाटील एपीआय, आधी सर्व अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     पालखीला सन्मानपूर्वक निरोप दिला. आबाल वृद्ध महिला व नागरिकांनी रंगीत उभे राहून दर्शन घेतले.

      पालखी सोहळा सकाळी आठ वाजता पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून लाखो वैष्णावांच्या व भक्तांच्या साथीने ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकारामच्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाली, सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर…

      सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलिस अधीक्षक सिरीस सर देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनूर, चेअरमन जयसिंग मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते, धैर्यशील भैय्यासाहेब, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी व, अकलूज उपविभागाचे पोलीस अधिकारी , अकलूजचे मुख्याधिकारी , पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब या सर्वांनीच जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्याच्या वेशी पाशी जंगी स्वागत करण्यात आले. व पुणे जिल्ह्यातून शेवटच्या मुक्कामानंतर सोलापूर जिल्ह्यात पालखी मार्गस्थ झाली. 

     चौकट

निरा नदीच्या पत्रात पाणी आणण्याकरिता प्रयत्न न केल्यामुळे भाविकांची नाराजी व ग्रामस्थांची इच्छाशक्ती आसताना सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केले.

त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना कृत्रिम पद्धतीने स्नान घालण्याची वेळ आली.

     चौकट

    आठ दिवसापूर्वी प्रयत्न केले आसते तर आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नैसर्गिक निरा नदीचे स्नान प्राप्त झाले असते.

      चौकट

शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी करावी व यापुढे आसा प्रकार घडू नये आशी सराटी व इतर सर्व भागातील भाविकांची इच्छा आहे.