Home Social मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी धानोरा येथे साळवे कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन…

मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी धानोरा येथे साळवे कुटुंबीयांची भेट घेऊन केले सांत्वन…

     रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         धानोरा येथील जिल्हा को- ऑपरेटिव्ह बँकेचे मानद सचिव अनंताभाऊ साळवे यांच्या आई स्व. निर्मलाबाई घनश्याम साळवे (वय ७७) यांचे दिनांक २१ एप्रिल ०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने साळवे कुटुंबासह धानोरा परिसरात शोककळा पसरली आहे.

             या दुःखद घटनेची वार्ता कळताच माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते यांनी धानोरा येथे साळवे कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

       “या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भगवंत त्यांच्या आत्म्यास शांती देवो व तुम्हाला या दु:खावर मात करण्याचे सामर्थ्य देवो,” अशा शब्दांत मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी आपली संवेदना व्यक्त केली.

          या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, नव्याने नियुक्त धानोरा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, युवा नेते सारंग साळवे, गजानन साळवे, तसेच साळवे परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते.