दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या तिर्थक्षेत्र आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या उर्वरित तीन विश्वस्त पैकी दोन विश्वस्त पदी वारकरी संप्रदायातील आळंदीकर ग्रामस्थांची निवड करण्यात आली आहे.
त्यात प्रामुख्याने आळंदीतील कबीर मठाचे चैतन्य महाराज कबीरबुवा व अमृतनाथ स्वामी मठाचे पुरुषोत्तम महाराज पाटील यांची निवड झाली आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत प्रथमच एक महीला विश्वस्त म्हणून प्रसिद्ध विधीतज्ञ ॲड.रोहीणी पवार यांची निवड झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी मध्ये एकूण सहा जनांचे विश्वस्त मंडळ असून दिड वर्षापुर्वी तीन विश्वस्तांची निवड करण्यात आली होती.
यामध्ये आळंदीकर विश्वस्त नसल्याने आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने जन आंदोलन उभे कले होते आणि आळंदीकर विश्वस्त व्हावा म्हणून केलेल्या आंदोलनाला यश आले असून उर्वरित तीन जागांपैकी दोन जागांवर आळंदीकरांची निवड झाली आहे.
त्यामुळे आळंदीकर ग्रामस्थ व आळंदी देवस्थान यांच्यातील होणारा संघर्ष आता कमी होईल अशी अपेक्षा आहे. चैतन्य महाराज लोंढे व पुरुषोत्तम महाराज पाटील यांची संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी वर विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल विविध स्तरावरून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



