Home Crime रेती तस्करी करणाऱ्यां तीन ट्रॅक्टरवर वनविभागाची धडक कारवाई.

रेती तस्करी करणाऱ्यां तीन ट्रॅक्टरवर वनविभागाची धडक कारवाई.

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

   चिमूर :-चिमूर तालुकातंर्गत पळसगांव बफर झोन वनपरिक्षेत्रातील महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतून रेती तस्करी करीत असताना अंदाजे स.९ वाजता तीन ट्रॅक्टरवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करीत तीन ट्रॅक्टर वनकार्यालयात आणून जप्त करण्यात आले.

        जप्त केलेले दोन ट्रॅक्टर हे बिना नंबरचे आहेत तर एक ट्रॅक्टर mH – 34 – L.8739 या नंबर चा आहे.वनकर्मचारी यांनी जप्त ट्रॅक्टरचा पंचनामा करुन पुढील कारवाई साठी चिमूर महसूल अधिकारी तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.

        तहसीलदार श्रिधर राजमाने नेमकी काय कारवाई करतात याकडे चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत.