दि.02 ते 11 मे 2023 पर्यंत क्रीडा शिक्षकांकरीता जिल्हास्तर क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन.

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

राज्यात क्रीडा संकृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याचे दृष्टीने राज्याचे क्रीडा धोरण 2012 घोषित करण्यात आलेले आहे. उपरोक्त क्रीडा धोरणाची अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने खेळा मधिल बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, नविन खेळ, खेळाची शास्त्रोक्त माहिती वेळोवेळी शिक्षकांना होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांच्या ज्ञानात भर पडावी व वेळोवेळी क्रीडा क्षेत्रात होणारे बदल अवगत होण्यासाठी, जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा प्रशिक्षण मिळण्यासाठी क्रीडा शिक्षक अद्यावत प्रशिक्षित असणे आवश्यक आहे.

 करीता गडचिरोली जिल्हास्तरावर 10 दिवसाचे क्रीडा शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण शिबीर क्रीडा प्रबोधनी, पोटेगांव रोड, गडचिरोली येथे दिनांक 02 ते 11 मे 2023 या कालावधीत आयोजीत करण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण शिबीरात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध शाळा, शासकिय आदिवासी आश्रम शाळा, नगरपरिषद शाळा, जिल्हा परिषद शाळा यातील क्रीडा शिक्षकांना / क्रीडा विषयक प्रभारी कार्य करणाऱ्या शिक्षकांना सहभागी होता येणार आहे. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या शिक्षकांची निवास व भोजन व्यवस्था कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे.

 उपरोक्त प्रशिक्षणात बालेवाडी पुणे येथून मास्टर्स ट्रेनर्स प्रशिक्षण पुर्ण करुन आलेले विविध विषयातील तज्ञ, कार्यालयातील आस्थापनेवरील क्रीडा मार्गदर्शक इत्यादी मार्फत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.

 उपरोक्त प्रशिक्षणात सहभागी होण्याकरीता कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या विहित नमुन्यात माहिती दि. 30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत कार्यालयात प्रत्यक्ष किंवा कार्यालयाच्या dsogad2@gmail.com या मेल पाठविण्यात यावी. 

 जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी या प्रशिक्षण शिबीराचा लाभ घ्यावा असे कळविले आहे.