Home सांस्कृतिक श्री राम जन्मोत्सवानिमित्त श्री शिव,दत्त, राम मंदिर रेखे वाडा दर्यापूर येथे किर्तन…...

श्री राम जन्मोत्सवानिमित्त श्री शिव,दत्त, राम मंदिर रेखे वाडा दर्यापूर येथे किर्तन… — ह.भ.प.सौ छायाताई पाथरे यांचे श्री राम जन्मोत्सवा निमित्त किर्तन…

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

दर्यापूर/_दर्यापूर येथील रेखे वाड्यातील अति प्राचीन श्री शिव, दत्त, राम मंदिर येथे श्री राम जन्मोत्सव साजरा केला जातो. या निमित्त ह.भ.प.सौ छायाताई गजेंद्र पाथरे रहाटगावकर अमरावती यांचे किर्तन आयोजित केले आहे. 

           दर्यापूर येथील रेखे वाड्यातील अति प्राचीन श्री शिव, दत्त, राम मंदिर मध्ये सन 1787 पासुन म्हणजे तब्बल 240 वर्षा पासुन अखंड पणे श्री राम जन्मोत्सव साजरा केला जातो. या श्री राम नवमिचे पर्वा मध्ये नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

             या वर्षी सुद्धा श्री राम जन्मा निमित्त ह.भ.प.सौ छायाताई गजेंद्र पाथरे रहाटगावकर अमरावती यांचे किर्तन दि 26मार्च रोज गुरुवार ला सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.

           यांचे किर्तनाला तबल्याची साथ श्री माधवराव रेखे तर हार्मोनियम ची साथ अश्र्विनीकुमार ग रेखे हे करतिल. तरी सर्व भाविक भक्तांनी या सत्संगाचा लाभ घ्यावा असे श्री शिव दत्त राम मंदिर न्यासचे सचिव श्री सचिन रेखे यांनी कळविले आहे.