Home Social आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्याकडून शिक्षणाकरिता आर्थिक मदत..‌

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्याकडून शिक्षणाकरिता आर्थिक मदत..‌

      रामदास ठुसे

 नागपूर विभागीय प्रतिनिधी..

           चिमूर नगरपरिषदेतील शेडेगाव येथील कु. साक्षी पुरुषोत्तम राऊत ही हुशार विद्यार्थीनी असून ती बी.एच.एम.एस च्या चौथा वर्षाला शिक्षण घेत आहे.

         तिच्या घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिचे शिक्षण राहते कि काय या विवेचनेत तिचे पूर्ण परिवार होते.तेथील भाजपचे स्थानिक कार्यकर्ते यांनी कुमारी साक्षीच्या शिक्षणाची समस्या आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या निदर्शनास आणून दिली.

      आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी तात्काळ भाजपाचे चिमूर- खडसंगी सर्कल मंडळाचे अध्यक्ष गजानन गुळधे यांना कुमारी साक्षीच्या शैक्षणिक समस्या निकाली काढण्यासाठी सांगितले.

          त्यांच्या मार्गदर्शनात भाजपा सामाजिक स्वयंसेवक रमेशभाऊ कंचर्लावर यांच्या हस्ते आर्थिक मदत देऊन कुमारी साक्षीच्या पुढील शिक्षणाच्या मार्ग मोकळा केला आहे.

        ह्या पूर्वीही मागील दोन वर्षे तिला मदत करण्यात आली होती.त्यामुळे ते कुटुंब आनंदीत झाले. ही आर्थिक मदत तिच्या वडिलांकडे देण्यात आली असून राऊत परिवाराकडून आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचे आभार मानले आहे.

        शैक्षणिकसाठी आर्थिक मदत देताना भाजपा कार्यालयांचे प्रमुख अरुण लोहकरे व नाझीया शेख उपस्थीत होते..