शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
वर्षातून एकदा ग्रामीण भागात होणारा मंडई उत्सव हा केवळ व्यापार नसून सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारा आणि संस्कृती लोककलेचा वारसा जपण्याचा सर्वात मोठा उत्सव आहे.
वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना,शेतमजूरांना विश्रांती मिळावी आणि समाजातील नातेसंबंध घट्ट व्हावेत,या उद्देशाने साजरा होणाऱ्या या उत्सवात दंडार,लोकनाट्य आणि भजनांच्या माध्यमातून ग्रामीण कलावंत आपली कला सादर करतात.
मंडई म्हणजे गावातील सर्व महिला-पुरुषांनी,युवक,युवतींनी,मजूरांनी,शेतकऱ्यांनी,विद्यार्थांनी एकत्र येऊन साजरा केलेला सण होय.या उत्साहात गावागावांतील नाते जोडली जातात आणि सामाजिक एकोपा जपल्या जातोय.
मंडई हे ग्रामीण कलावंतांचे व्यासपीठ आहे.झाडीपट्टी रंगभूमी द्वारे नाटकांचे,दंडारींचे,लावण्यांचे,गोंधळांचे,होणारे सादरीकरण,लोककलेला जिवंत ठेवतोय…
खरीप हंगामातील कष्टानंतर विश्रांती मिळावी,म्हणून या दिवसात मंडईचे आयोजन केले जाते.या काळात गावागावात रोषणाई केली जाते,रोषणाईने उजळून निघणारा गाव एक वेगळ्या प्रकारचा आनंद मनाला देवून जातोय…
अनेकदा मंडईत लोककलाकारांना प्रोत्साहन मिळतय.यामुळे नविन कलावंत घडू लागतात,ज्यामुळे ग्रामीण भागातील संस्कृती जिवंत राहण्यासाठी मदत मिळते…



