शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
जिल्हा सेवा समिती व तालुका सेवा समिती चिमूर यांचे संयुक्त विद्यमाने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचे कृपा आशीर्वादाने व रामा रामानंदाचार्य दक्षिण पिठाचे उत्तराधिकारी यांचे प्रेरणेने चंद्रपूर जिल्ह्याला जिल्हास्तरीय भव्य पादुका दर्शन सोहळा 21 जानेवारी 2026 ला चिमूर येथे रायपूरकर सभागृह बीपी कॉलेज मैदानावर संपन्न होत आहे.
त्या होणाऱ्या भव्य कार्यक्रमाकरिता पूर्व नियोजन सभा शंकरपूर येथे किल्ला मंदिर सभागृहात दिनांक 20 डिसेंबर रोजी पार पडली.
या सभेकरिता प्रामुख्याने जिल्हा निरीक्षक माननीय उरकुडे साहेब, जिल्हा अध्यक्ष गणराज्य बघमारे, जिल्हा महिला अध्यक्ष आकांक्षा पोढे व सर्व जिल्हा सेवा समिती महिला पीठ निरीक्षक चतुर्थी सर्व तालुका अध्यक्ष तसेच तालुका कमिट्या व हितचिंतक कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक उपपीठ पूर्व विदर्भ सह पिट प्रमुख माननीय सुरेशजी लाखे साहेब, पीठ सदस्य माननीय राजेश येरणे तसेच पूर्व नियोजन सभेकरिता प्रोटोकॉल अधिकारी राणा साहेब, गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शनात पूर्व नियोजन सभा पार पडली.
पादुका दर्शन सोहळ्या करिता रॅली, संत पीठ आध्यात्मिक विचार संस्कृतीचे जतन, उपासक दीक्षा गुरुपूजनाचे महत्त्व आधी वर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातून 400 अधिक भक्त गण कार्यक्रमाला उपस्थित होते. जिल्हा नियोजन सभेचे प्रास्ताविक जिल्हा निरीक्षक उरकुडे साहेब यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तालुका सेवा अध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी केले.



