Home Maharashtra बदनामी केल्याच्या कारणावरून कमलेश बांबोळे विरोधात माजी पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक...

बदनामी केल्याच्या कारणावरून कमलेश बांबोळे विरोधात माजी पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक यांनी केली तक्रार दाखल… — भांदवी कलम ३५६/२ अंतर्गत गुन्हा दाखल… — वयैक्तीक,राजकीय व सामाजिक चारित्र्याचे हनन करण्यामागे विरोधकांचे षडयंत्र?..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

         चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन रवी ढोक हे उज्जैन येथे फिरायला गेले असता त्यांनी,”बौद्ध धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केला व त्यांनी ह.भ.प.रोशन महाराज नाव स्विकारले असल्याची,”बदनाम करणारी बनावट पोष्ट चिमूरचे कमलेश बांबोळे यांनी,”चिमूर जिल्हा झालाच पाहिजे,या वाॅटसप गृपवर टाकली होती.

              यामुळे उज्जैन वरुन परत आल्यावर भिसी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर येथील पोलिस चौकी मध्ये श्री.कमलेश बांबोळे यांच्या विरोधात २० डिसेंबर २०२५ ला श्री.रोशन रवी ढोक यांनी तोंडी तक्रार दाखल केली.तक्रारीला अनुसरून श्री.कमलेश बांबोळे यांच्यावर भांदवी कलम ३५६/२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

         चिमूर पंचायत समितीचे माजी सभापती रोशन रवी ढोक हे काही महत्त्वाचे स्थळे बघायला गेले होते.ते उज्जैन येथे गेले असता सफेद रंगाचे धोतर व सर्ट अंगात परिधान करून आणि कपाळावर अष्टगंध लावून त्यांनी स्वतःचे फोटो काढले होते व ते फोटो फेसबुकवर सार्वजनिक केले आणि स्वतः हेच फोटो टेटसवर ठेवले होते.

        चिमूर येथील श्री.कमलेश बांबोळे यांनी घटनाक्रमाची सत्य माहीती न घेता,”चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री.रोशन रवी ढोक यांनी बौद्ध धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार केला व ह.भ.प.रोशन महाराज असे नाव स्विकारले असे कळते,अशी पोष्ट चिमूर जिल्हा झालाच पाहिजे या वाॅटसप गृपवर सार्वजनिक केली.

            श्री.कमलेश बांबोळे यांनी सार्वजनिक केलेल्या असत्य पोष्टमुळे चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन रवी ढोक यांची वैयक्तिक,राजकीय व सामाजिक स्तरावर भयंकर बदनामी करण्यात आली व त्यांच्या चारित्र्याचे सार्वजनिक हनन करण्यात आले..

            महत्वाचे असे की,श्री.रोशन रवी ढोक यांच्या बदनामीचा सार्वजनिक प्रकार हा,”सामाजिक भावना सखोल दुखावऱ्या असल्याने,त्यांना कमलेश बांबोळे यांनी सार्वजनिक गृपवर टाकलेल्या,”बौध्द धर्माचा त्याग करून हिंदू धर्माचा स्वीकार करणाऱ्या,सदर पोष्टमुळे भयंकर त्रास झालेला आहे.

        स्थानिक स्तरावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षात दोन गट असल्याने,”रोशन ढोक यांची बदनामी जाणिवपूर्वक केली जात आहे काय?हा प्रश्न सध्यातरी लोकचर्चेचा भाग बनला आहे.

         पण,सदर असत्य पोष्टमुळे चिमूर पंचायत समितीच्या माजी उपसभापतींची झालेली नाहक बदनामी,व चारित्र्याचे सार्वजनिक करण्यात आलेले गलिच्छ हनन भयंकर संतापजनक आहे असेच म्हणावे लागेल.

           मात्र,सदर पोष्टला अनुसरून श्री.कमलेश बांबोळे यांनी माफी मागितली असल्याने कळेल आहे…