शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा वाघेडा गावात स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिकाना मृतदेह जाळण्यासाठी व दफन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची संवेदनशील बाब पुढे आली आहे.
खाली जागेवर मोठ्या प्रमाणात झाडे आणि कचरा झाला आहे,सध्या प्रेत जाळण्यासाठी योग्य ती व्यवस्था उपलब्ध नाही,ट्रॅक्टरचा आधार घेऊन झाडे तोडणे,रोटावेटर करणे,अशी वेळेवर मृतांच्या नातेवाईकांना त्यांना कामे करावे लागतात.
आजतर वेळेवर गावातील नागरिकांचा आधार घेऊन मृत व्यक्तीवर अंतिम संस्कार करावे लागले.शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही मृतदेहाची ससेहोलपेट थांबण्याचे नाव घेत नाही.
वाघेडा गावात स्मशानभूमी नाही….
वाघेडा गावात ३०० घरांची वस्ती आहे.मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध आहे,पण अजून पर्यंत बांधकाम झालेला नाही.जायला योग्य तो रस्ता नाही,सगळीकडे बोरीचे झाडे,काळी कचरा मोठ्या प्रमाणात आहे!
स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध असूनही तिथे स्मशानभूमीचे बांधकाम झालेले नाही.नागरिकांना पावसाळ्यामध्ये चिखलातून प्रेत जाळण्यासाठी न्यावे लागते,ग्रामपंचायतला नागरिकांची दया येत नाही,प्रत्येक आमसभेमध्ये स्मशानभूमीचा विषय काढला जातो,ग्रामपंचायत मध्ये सरपंच लवकरच कामे केले जाईल असे आश्वासने देतो पण स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची व स्मशानभूमीवरील आवश्यक कामांकडे लक्ष दिले जात नाही.
त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याचे गरजेचे आहे.कारण आज सदर २ व्यक्तीचे वाघेडा गावात मृत्यू झाले,यात श्री.अमोल तुकाराम चौधरी वय ४२ यांचे सोमवार दुपारी १२ वाजता अल्प आजाराने
निधन झाले. दुसरे व्यक्ती श्री . दयाराम चौधरी यांचे सुद्धा निधन झाले.
वाघेडा गावात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच रानमाळावर त्यांच्या मयतावर अंत्यसंस्कार करावे लागले.
यानंतर मृताच्या नातेवाईकांनी लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.देश स्वतंत्र होऊन ७८ वर्ष झाली परंतु वाघेडा या गावाला आजपर्यंत स्मशान भूमी बांधण्यात आली नाही ही लाजिरवाणी बाब असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
शासन प्रशासनाने लक्ष घालून आमचा प्रश्न सोडवावा,असे विनंती ग्रामस्थांनी केली.



