समर्थ महाविद्यालय लाखनी येथे साप्ताहिक “नो व्हेईकल डे” अभियान…  –“पर्यावरण मुलक अभियान”…

  चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

        समर्थ महाविद्यालय लाखनी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांच्या संकल्पनेतून ” नो व्हेईकल डे ” हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. महाविद्यालयामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारला नो व्हेईकल डे राबविण्यात येत आहे.

          या उपक्रमात विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी महाविद्यालयामध्ये पायी किंवा सायकल याच साधनांनी येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना शारीरिक व्यायाम होईलच शिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहतुकीमुळे होणारी कोंडी आणि पायी चालणे या गोष्टीना प्रोत्साहन मिळेल सायकल चालवण्याची सवय यामुळे लागेल.

         यामुळे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहील , प्रदूषणमुक्त अभियानामध्ये सहभाग वाढेल, इंधनाचा वापर कमी होईल, ही या उपक्रमामागील भूमिका आहे. असा उपक्रम सर्व शासकीय आणि निमशासकीय संस्था कार्यालयातही व्हावा अशी माफक अपेक्षा आहे.