दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भक्ती, संस्कृती आणि कलेचा अविष्कार घडवणारा नवरात्रोत्सव सोहळा श्री दत्तनगर प्रतिष्ठाण, गणेश मंदिर येथे दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. विविध भक्तिमय कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव अधिक मंगलमय होणार असल्याचे दत्तनगर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष उमेश कुऱ्हाडे यांनी सांगितले आहे.
कार्यक्रमांची सुरुवात २२ सप्टेंबर रोजी सायं. ७ ते ९ या वेळेत भजन व हरिपाठाने होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायक अवधुतजी गांधी व सहकलाकार आपले सुश्राव्य गायन सादर करणार आहेत. २४ सप्टेंबरला पुणे येथील राष्ट्रीय शाहिरी संच प्रमुख श्री. श्रीकांतजी शिर्के यांचा “गाथा राष्ट्रगौरवाची” हा कार्यक्रम होणार आहे.
२५ सप्टेंबर रोजी भारूड सम्राट ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील (अकलुज) यांचा भारूड कार्यक्रम, २६ सप्टेंबरला ह.भ.प.घोडके महाराजांचे भजन, तर २७ सप्टेंबरला वाघजाई महिला भजन मंडळ, मानकर ताई यांच्या नेतृत्वाखाली भक्तिरस सादर करणार आहेत.
२८ सप्टेंबर रोजी “सुर नवा ध्यास नवा” फेम ऋषिकेश पाटील व प्रियंका चौधरी (ढेरंगे) यांचे भजन-गायन, २९ सप्टेंबरला सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांचा अंभग भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ३० सप्टेंबरला “जागर श्री शक्तीचा, सूर गृहलक्ष्मीचा” हा विशेष कार्यक्रम ज्योती गोराणे (गौरव महाराष्ट्राचा उपविजेत्या) यांच्या प्रमुख गायनाने रंगणार असून त्यांना संगीत संयोजनाची साथ शामजी गोराणे (प्रसिद्ध तबलावादक) करणार आहेत. सोहळ्याचा समारोप १ ऑक्टोबर रोजी हरिकिर्तन भजनसंध्या – अंजनाताई जगताप यांच्या सादरीकरणाने होणार आहे.
श्री दत्तनगर प्रतिष्ठाण आयोजित हा नवरात्रोत्सव भक्तिमय आणि सांस्कृतिक सोहळ्याची पर्वणी ठरणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक उमेश कुऱ्हाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



