युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यात चालू वर्षात जून ते सप्टेंबरपर्यंत सततचा पाऊस भरपूर प्रमाणात झाला असल्याने दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील तूर, सोयाबिन आणि कपाशी या पिकांवर सततच्या पावसामुळे शेती पिकांवर विपरीत होऊन जवळपास सर्व पिके ही नष्ट झालेली आहेत. शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या पुर्वी नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठविण्याबाबत दर्यापूर येथिल उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसिलदार रविंद्र कानडजे यांना करपलेली पहाटी,सोयाबीन झाडे व निवेदन शिवसेना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ नुकसान भरपाई रूपये जमा करा. अशा प्रकारच्या घोषणांनी तहसिल परिसर दणाणून सोडला व शिवसेना आमदार गजानन लवटे प्रसार माध्यमांशी बोलत असतांना विजयादशमी (दसऱ्या) पर्यंत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर्फे राज्य शासनाच्या विरोधात तीव्र जन आंदोलन उभे करू असे सांगितले.
निवेदन सादर करतांना आले त्यावेळी शिवसेना आमदार गजानन लवटे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर ,शिवसेना जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ अलका निलेश पारडे, महिला जिल्हाप्रमुख ज्योती अवघड, सहकार सेना जिल्हाप्रमुख अरुण खारोडे, उपजिल्हाप्रमुख महेंद्र दिपटे, विधानसभा संघटक बबनराव विल्हेकर, विधानसभा समन्वयक प्रमोद गिरनाळे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख वर्षा भोंडे, युवासेना जिल्हा चिटणीस प्रतिक राऊत, तालुकाप्रमुख प्रमोद धानोरकर, अंजनगाव तालुका प्रमुख कपिल देशमुख, अंजनगाव शहर प्रमुख राजू अकोटकर, महिला आघाडी अंजनगाव तालुकाप्रमुख संगीता तुरखेडे, युवासेना दर्यापूर तालुकाप्रमुख सागर गिरे, युवासेना अंजनगाव तालुका प्रमुख विशु सावरकर, युवासेना दर्यापूर शहर प्रमुख रुपेश मोरे, शिवसेना तालुका संघटक गुणवंत गावंडे, शिवसेना तालुका समन्वयक किशोर टाले, विकास येवले, मनोहर माहुरे, महिला आघाडी दर्यापूर शगर कोषाध्यक्ष पूजा रामावत, सरपंच विजय आढाउ, सरपंच मोहन बायस्कर, उपशहर प्रमुख दीपक बगाडे, अमोल गावंडे, सतीश साखरे, अभिजीत मावळे, अभिजित भावे, शुभम विल्हेकर, गणेश खंडारे, सतीश जमणिक, प्रशांत धर्माले, मंगेश पारडे, नितीन माहूरे, आशीष लायडे, अनिकत वाघझाडे, मोहन खरबडकार, मंगेश धुराटे, सुखदेव मानकर, राजू मानकर, संगीता मांडवे, मनीषा कडू, मंदा बयस, विद्या बयस, विलास गिरे, शिवा राऊत, दर्शन गवई, पप्पू गावंडे, कौस्तुभ प्रांजळे, अमन पटेल, सतीश बनारसे, निलेश पारडे तसेच शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.



