Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — दर्यापूर तहसिल कार्यालयाजवळ 55 वर्षीय इसमाचा खुन… —...

ब्रेकिंग न्यूज… — दर्यापूर तहसिल कार्यालयाजवळ 55 वर्षीय इसमाचा खुन… — अज्ञात व्यक्तीच्या नावाने खुनाचा गुन्हा दाखल…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक 

         दर्यापूर अमरावती रोडवरील तहसिल कार्यालय जवळ असलेल्या धनंजय लॉजच्या पाठीमागे 55 वर्षीय इसमाची डोक्यावर लाकडी दांड्याने जबर घाव घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (22) रात्रीच्या वेळी घडली असून आज (23) मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.

          राजेश अभिमान इंगळे ( वय.55 ) रा. सैनिक कॉलनी दर्यापूर असे मृतक व्यक्तीचे नाव असून ते दर्यापूर तहसिल कार्यालयातील नक्कल विभागात रोजंदारीने काम करीत होते. सोमवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान तहसिल कार्यालयासमोर आपली दुचाकी उभी करून त्यांनी काही लोकांशी संवाद साधला असल्याचे येथिल काही नागरिकांकडून सांगण्यात आले.

        त्यापूर्वी 9:30 वाजताच्या दरम्यान मुलगा सौरभ याने वडीलांना फोन लावून घरी केव्हा येत आहे अशी विचारणा केल्याचे त्यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले.

       वडील उशिरापर्यंत घरी परत आले नसल्याने त्यांच्या मोबाईलवर फोन लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद दाखवत असल्याने मुलगा सौरभने सोमवारी रात्री उशिरापर्यंत वडीलांचा शोध सुद्धा घेतला परंतु त्यांची एम एच 27 सि टी 0273 क्रमांकाची एक्टिवा गाडी तहसिल कार्यालय समोर त्याला उभी दिसली वडील त्या ठिकाणी दिसत नसल्याने त्याने तहसिल मधिल सुरक्षा रक्षकाला सुद्धा विचारपूस केली व तो घरी परतला. घटनास्थळाला लागून एक इंग्लिश स्कूल असल्याने मंगळवारी सकाळी काही पालक आपल्या मुलांना शाळेत सोडून देत असताना ही घटना सकाळी उघडकीस आली. 

        दर्यापूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एस डी पी ओ सतिश कुलकर्णी व ठाणेदार सुनिल वानखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे पाठवण्यात आला. 

         घटनास्थळी अमरावती गुन्हे शाखा पथक, फॉरेन्सिक पथक तसेच श्वान अथक पोहोचले होते.