कुरखेडा उपविभागिय क्षेत्रातंर्गत पोलिस पाटील पदांच्या भरती प्रक्रियास प्रारंभ….

 

      राजेंद्र रामटेके 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा 

           गडचिरोली जिल्ह्यातंर्गत कुरखेडा उपविभागीय क्षेत्रातील पोलीस पाटलांची रिक्त झालेली पदे शासकीय नियमानुसार भरली जाणार आहेत.उपविभागीय कार्य क्षेत्रात दोन तालुक्यांचा समावेश आहे. 

             पोलीस पाटलांच्या ८५ पदाची भरती होणार असून त्यापैकी ८१ पदे पेसात येत आहेत. 

          यामुळे अनुसुचित जमाती सर्वसाधारण करीता ५४ पदे राखीव करण्यात आली आहेत.तसेच अनुसुचित जमाती महिलांसाठी २७ पदे राखीव आहेत. 

           याचबरोबर अनुसुचित क्षेत्रातील एकुण ४ पदे रिक्त आहेत.सदर पदांसाठी आँनलाईन पद्धतीने २४ ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात आली आहेत.