मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला : मा.राज्यमंत्री बच्चू कडू

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : राज्यात एकनाथ शिंदे यांचे बरोबर मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला.सरकार स्थापन होऊन आता वर्षापेक्षाही जास्त कालावधी झाला आहे. परंतु शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर नेमके काय ठरले होते..? या गोष्टींच्या चर्चा अधुनमधून होत असतात.

        त्यावर आता आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठा गौप्यस्फोट केला. गुवाहाटीला जाण्यापूर्वी भारतीय जनता पक्षासोबत काय ठरले होते.? खोके की अन्य काय…हे बच्चू कडू यांनी सांगितले.

काय म्हणाले बच्चू कडू

      मला गुवाहाटीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी अगोदर देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झाले, अशी माहिती बच्चू कडू यांनी भर कार्यक्रमात दिली.

        फडणवीस यांच्याच सांगण्यानुसार मी शिंदे सरकारमध्ये शामिल झाल्याचं गुपित आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये दिव्यांग कल्याणकारी योजनाच्या कार्यक्रमात बोलत होते.