ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- नवजीवन कॉन्टेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल (सीबीएसई) साकोली येथे २०२५ – २६ शैक्षणिक सत्रातील प्रथम दिनी विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शालेय परिसर, वर्गखोल्या व शालेय प्रांगण अतिशय मनमोहक पद्धतीने सजविण्यात आली होती.
शाळेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पंचारती ओवाळणी करून व पुष्पगुच्छ, भेटवस्तू देउन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत वर्गखोल्यांमध्ये प्रवेश करवून दिला गेला. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी तोंड गोड करून सर्वांचे अभिनंदन केले गेले. नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी स्वतः तयार केलेले भेटकार्ड देउन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्या भारती व्यास, शाळा व्यवस्थापक विनोद किरपान, प्रशासकीय अधिकारी सतिश गोटेफोडे, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, जयंत खोब्रागडे, अजय बाळबुद्धे, किशोर बावनकुळे, विन्नुष नेवारे, सत्यजित चव्हाण, जय हरणखेडे, विजय परशुरामकर, जोशिराम बिसेन, प्रशांत वालदे, धनंजय बोरकर, सरताज साखरे, रोझी पठान, सुनिता बडोले, वैशाली भगतकर, दिपा येले, पुण्यप्रभा उपासे, प्रतिमा डोंगरे, स्वेजल टेंभुर्णे, माधुरी हलमारे, ज्योती डोंगरवार, लिलेश्वरी पारधी, वैशाली राउत, रेखा हातझाडे, स्मिता मस्के, वैशाली कोचे, अनिता धुर्वे, शालिनी धुर्वे, प्रिती फुलबांधे, मेघा संग्रामे, निलिमा हरडे, सीमा राऊत, प्रियंका झोडे, जया बडवाईक, शितल कोरे, छाया केवट, अस्मिता मस्के, निशा देवगिरकर, पल्लवी मेश्राम, संगिता जांभूळकर, शिला चव्हाण, रुपाली शेंडे, भाग्यश्री भोयर, यामिनी बोरकर आदी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



