जय पेरसापेन माध्यमिक विद्यालय जांभळी येथे सावित्रींच्या लेकींना साईकलचे वितरण…

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

              जय पेरसापेन माध्यमिक विद्यालय, जांभळी ता.धानोरा जि.गडचिरोली येथील 2 विद्यार्थ्यिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वितरण नुकतेच करण्यात आले.

        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम बावणे होते.प्रमुख अतिथी म्हणून जि.प. शाळा जांभळी येथील मुख्याध्यापीका सौ.कल्यानीताई चौधरी व गावातील नागरिक उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यिनींना साईकलींचे वितरण करण्यात आले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.आर.मेश्राम,संचालन एस.जी.अवथरे यांनी केले.यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापीका कु. एस. जे.दाजगाये,व्ही.पी.मारकवार,कु.एच.आर.खांडरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.