चिमूर येथील संत जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव..

        रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

 चिमूर:- 

              श्री.संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूर च्या सौजण्याने संताजी जगनाडे महाराज यांच्या २० व २१ जानेवारी शनिवार, रविवार दोन दिवशीय उत्सव घेण्यात आला. रविवारला दुपारी गुणगौरव सोहळा,बक्षिस वितरण व मान्यवरांचे समाज प़बोधन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य संघटक विदर्भ तेली समाज प्रा.रमेश पिसे मार्गदर्शन करतांना म्हणाले की,आज मंदीरे बांधण्यापेक्षा शाळा बांधणे आवश्यक आहे.

      यावेळी विचार मंचावर अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त प्रा. महादेवराव पिसे,उद्घाटक रमेश पिसे मुख्य संघटक विदर्भ तेली समाज,केंद्रीय उपाध्यक्ष,विदर्भ तेली समाज धनराज मुंगले,चिमूर चे ठाणेदार मनोज गभणे,नागपुर येथील जेष्ठ वक्त्या वंदना वनकर,उद्योजक तथा प्रगतशिल शेतकरी अनिल मेहर,गोविन्द तळवेकर,राजू अगडे,भास्कर बावणकर,अँड.धनराज वंजारी,ईश्वर डुकरे,विनोद पिसे,डॉ.सुरेश लाखे,श्रीरंग पिसे,पितांबर पिसे,प्रविण सातपुते,विलास बंडे,हरिष पिसे,अभय धोपटे,नरेन्द्र विखार,ज्ञानेश्वर,संजय खाटीक, संजय कामडी,रामदास कामडी,प्रदीप बंडे,प्रभाकर पिसे,किशोर येरणे,उमेश हिंगे,राजू हिगंणकर,राजू बावणकर,हरिष पिसे,ज्ञानेश्वर साठोणे,भरत बंडे,संतोष गोहणे,प्रविण कावरे,अनंता कामडी उपस्थित होते.

    २० व २१ जानेवारी रोज शनिवार- रविवारला आयोजित उत्सव निमित्त परिसर स्वच्छता,महिला मेळावा व महिलांच्या विविध स्पर्धा,चिमूर शहरातील संताजी जगनाडे महाराज अधिष्ठाण ते मुख्य मार्गाने मोटार सायकिल रॅली,सांस्कृतिक कार्यक्रम,संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक,वारकरी भजन पथक अमरावती यांचा रिंगण सोहळा,लकी ड्रॉ अशाप्रकारे उत्सव आयोजीत केलेला होता.

   प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी संचालन प्रा.पितांबर पिसे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्रीहरी सातपुते यांनी मानले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.भास्कर बावणकर अध्यक्ष पुण्यातिर्थी आयोजन समितीसह श्री.संत जगनाडे महाराज तेली समाज कल्याणकारी मंडळ चिमूरच्या समस्त कार्यकर्ते व तेली समाज बांधवांनी सहकार्य केले.