‘जय श्रीराम’ च्या जयघोषाने दुमदुमले खल्लार सर्कल,युवा उत्सव समिती व सह्याद्री युवा विचार मंच खल्लार सर्कल तर्फे आयोजन…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

       श्री राम मंदिर स्थापना दिवसा निमित्त युवा उत्सव समिती खल्लार सर्कल तर्फे भव्य उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

            यानिमित्त खल्लार स्टॉप वर रविवारी रात्रीच सर्व वातावरन भगवे झाले होते. यावेळी उत्सव समितीच्या वतीने भगव्या पताका, झेंडे बलून,बॅनर होल्डिंग सजविण्यात आले व डिजे लावून खल्लार स्टॉप चौक हा भगवामय करण्यात आला होता.

        दिं.२२ला सकाळी चौकाची साफसफाई करून प्रभू श्रीरामाचे मोठे होल्डींग लावुन ते हार फुलानी सजविले व डिजे वर श्रीरामगीत व हनुमान चालीसा लावुन वातावर हे रामभक्तीमय झाले होते.

         दुपारी ठिक १२.३० ला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामचंद्रची मूर्ती स्थापना होताच दिवे लावून हारार्पन करून पूजन करण्यात आले प्रसाद वाटून फटाके फोडून उत्सव साजरा करण्यात आला.

            संध्याकाळी प्रभू श्रीरामचंद्र च्या होल्डिग समोर भव्य रोषणाई करण्यात आली. खल्लार स्टॉप ते श्री पाहुणे बाबा मंदीर खल्लार पर्यंत भव्य बाईक रॅली काढून जय श्रीराम चा जयघोष करण्यात आला व स्थापनेचा उत्सव खल्लार स्टॉप वर करण्यात आला.

          यावेळी युवा उत्सव समिती खल्लार सर्कल चे श्री गोपाल यादव, अमेय मोपारी, शैलेश मेटकर,सोपान घुरडे, तेजस मोपारी,आशिष भोंडे, अंकुश रहाटे, सुमित वानखडे, शरद काळंके, ऋषि सवाई, ऋषि सावरकर, श्रीलेश मोपारी, बबलू घुरडे, सत्यजित वर्धे,धनेश मोपारी सचिन सदार, कार्तिक जवंजाळ, वेदांत रहाटे, विलास तळोकर, हर्षद पठाण, ह्यांनी आयोजन व सहकार्य केले.

           यावेळी खल्लार सर्कल मधील प्रतिष्ठीत अतुल बुरघाटे, संदीप मालठाने, निलेश मोपारी,योगेश मोपारी, अजय मोपारी,शैलेश बुरघाटे,धिरज राऊत,किशोर मोपारी, सुधीर रहाटे,तुळशीदास रोडे,ऋषीकेश मोपारी,दिनेश कडू, राजेश वानखडे, शैलेश बोंडसे,उमेश बोंडशे,अभिजित घाणे, सज्जन मोपारी, विवेक मोपारी, अणुराग जुनघरे, पंकज रोडे,गिरी भाऊ, ह्यांच्या सह शेकडो रामभक्त या वेळी प्रामुख्याने उपास्थित होते.