Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — पाथरी पोलिसांनी दारू तस्करांच्या शिताफीने आवळल्या मुसक्या!

ब्रेकिंग न्यूज… — पाथरी पोलिसांनी दारू तस्करांच्या शिताफीने आवळल्या मुसक्या!

   अमान कुरेशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

     दखल न्यूज भारत

 — स्विफ्ट डिझायर व मोपेडमधून विदेशी दारूची तस्करी करणे पडले माहागात,पोलिसांनी उधळली तस्करांची योजना…

— ६.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त,तिघे आरोपी कोठडीत…

        दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी पाथरी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मौजा पालेबारसा ते पाथरी रोड मार्गे काही व्यक्ती काळ्या रंगाच्या मोपेड व पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कार मधून अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करीत आहेत.

       यानुसार पाथरी पोलिसांनी पंचांसह आसोला–मेंढा गोसीखुर्द नहराजवळ नाकाबंदी केली.काही वेळातच संशयित मोपेड व स्विफ्ट डिझायर दिसताच वाहनांना थांबविण्यात आले.

         कार मधून तब्बल ३३६ नग विदेशी दारूचा साठा चौकशीदरम्यान कारमधील युवकाने आपले नाव क्रिष्णा धर्मा कंजर (वय 19, रा. जलनगर वॉर्ड,चंद्रपूर) असे सांगितले.

       त्याच्या कारची डिक्की तपासली असता चुंगडी व खरड्याच्या खोक्यात रॉयल स्टॅगची ३३६ नग विदेशी दारू (180 ML) – किंमत ₹84,000 सापडली.

         दारू वाहतुकीसाठी वापरलेली Swift Dzire MH40-AR-6803 – किंमत ₹5,00,000 यासह एकूण ₹5,84,000 चा मुद्देमाल जप्त झाला.

 दुचाकीवरील दोन आरोपींकडूनही विदेशी दारू जप्त….

      सुझुकी अ‍ॅक्सेस (MH34-CP-2798) वर ताब्यातील—

प्रकाश रमेश भोयर (वय 37, रा. भानापेठ, चंद्रपूर)

सागर राजेश कंजर (वय 32, रा. जलनगर वॉर्ड, चंद्रपूर)

यांच्याकडेून रॉयल स्टॅग विदेशी दारू ४८ नग (₹12,000) व

दुचाकी ₹60,000 किंमतीची जप्त करण्यात आली.

मोबाईल 3 नग मोपेड,स्विफ्ट कार असा एकूण ₹6,78,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

         तिघा आरोपींवर पोस्टे पाथरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

        पुढील तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणेदार नितेश डोर्लिकर यांचे पथक करत आहे.