Home देशविदेश RSS ने अर्थात मोहन भागवतने आपल्या शीलेदारांकरवी म्हणजे मोदी / शहा गुजरात...

RSS ने अर्थात मोहन भागवतने आपल्या शीलेदारांकरवी म्हणजे मोदी / शहा गुजरात लॉबीकडून स्विस बँकेतील भारतीय चोरांनी ठेवलेले पैसे काढून आणून RSS च्या RBI मध्ये टाकले का?

      वरील शंका आम्हांला (आम्ही भारताचे लोक ) येत आहे…..!

कारण…

        भाजप आणि त्यांचे नेते जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते बोलत नाहीत.आणि जे चुकून बोलले जातात ते निश्चितच केल्याशिवाय राहत नाहीत.

         2014 च्या लोकसभेच्या निवडणुका भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आम्ही भारतीय चोरांनी स्विस बँकेत ठेवलेले पैसे परत आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकून देऊ. अशी घोषणा केलेली होती. त्याचप्रमाणे आम्ही अच्छे दिन आणू. या घोषणेला भाळलो आणि काँग्रेसला सुद्धा 10 वर्षे झाली होती, म्हणून आम्ही भाजप आणि मीत्रपक्षाला स्पष्ट बहुमताने केंद्रात सत्तेत बसवले.

         परंतू , चुकून बोललेले आणि ऍड.राम जेठमलांनी यांना मोदी / शहाने स्विस बँकेतून आम्ही सर्व पैसा आणण्याचा शब्द देतो परंतू मला ( शहाला ) तुम्ही खुनाच्या ( शहाबुद्दीन सोराबजीच्या ) गुन्ह्यातून निर्दोष सोडा आणि भाजपला निवडून आणण्यासाठी मदत करा असा तह झाल्यामुळे आणि…

        कदाचित ही जोडगोळी भाजप सत्तेत येऊन स्विस बँकेतून पैसे आणून सुद्धा ते पैसे भारत सरकारच्या तिजोरीत जमा न करता RSS ने आपल्याच खात्यात कदाचित टाकून घेतल्यामुळे की काय….

       तेच ऍड.राम जेठमलानी म्हणतात, ” मोदी/ शहा आणि भाजपला या खोटारड्या पक्षाला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत चुकून सुद्धा सत्तेत येऊ देऊ नका!”

        राम जेठमलानीच्या बोलण्याचा अर्थ काय असू शकतो?

कदाचित…..

       याचा अर्थ असा असू शकतो की,काँग्रेसच्या राजवटीच्या काळात आपल्या देशातील चोरांनी ( चित्रपट सृष्टी, राजकारणी, भांडवलदारांनी, निरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी, मेहुलकुमार चौकसे सारख्या उद्योगी उचापतीनी देशातून पलायन करून लंडनमध्ये आश्रयास राहणारे आणि देशात राहणारे पांढरपेशा चोरांनी ) केलेल्या चोरीच्या पैशाला मोदी / शहाने आणले भारतात परत आणले. त्यासाठी विश्वगुरूने आपली शक्ती पणाला लावली.तसेच ज्या ज्या चोरांच्या पैश्याची नावे आली त्यांना ईडीचा धाक दाखवून गप्प बसवले. तुरुंगाच्या भीतीने अनेकांनी मौन धारण केले.

        म्हणूनच काँग्रेस पक्ष भाजपच्या समोर आमने सामने निवडणुकीतील लढाई लढू शकत नाही आणि जिंकूही शकत नाही. हे वास्तव कारण असू शकेल!

        म्हणूनच की काय EVM ला विरोध सुद्धा काँग्रेस पक्ष ठामपणे न करता, रस्त्यावर EVM च्या विरोधात न उतरता ( EVM मुळेच भाजप सत्तेत तिसऱ्यांदा आलेले आहे,हे ठाऊक असून सुद्धा ) प्रखर विरोध करत नाही.

       या सर्वांचा परिणाम असा दिसतोय,की भाजपाने 2024 च्या निवडणुकीत पाण्यासारखा वाटलेला पैसा( विनोद तावडेला पैसे वाटतांना पकडून सुद्धा)!

        महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाटलेला पैसा लिगली लाडक्या बहिणीचे 1500/- रुपये वाटप आणि निवडणुकीनंतर 15 दिवसांनी एका एस. टी.बसमध्ये सीटखाली एका प्रवाशाला 500/- च्या नोटाची दोन बंडले एक लाख रुपये एका लिफाफ्यात सापडली!

     तसेच अजित पवार व एकनाथ शिंदे गट फोडण्यासाठी लागणारे खोके….

    हरियाणा,मध्यप्रदेश,राजस्थान निवडणुकीत लागणारे काळे पैसे…..

      आता तर बिहार निवडणूकीत महिलांना प्रत्येकी 10,000/- खात्यात भाजप जमा करत आहे…

          हे वरील सर्व पैसे प्रत्येकी 15 लाख आपल्या खात्यात किंवा भारत सरकारच्या तिजोरीत टाकण्याऐवजी RSS ने स्वतःच्याच खात्यात टाकून अशा पद्धतीने देशाला कंगाल करून लोकशाही आणि संविधान संपवून भांडवलशाही ( अदानी, अंबानी ) देश निर्माण करण्याचा मनसूबा आम्ही भारताचे लोकं यशस्वी होऊ देणार का?

    त्यासाठी बुद्धीजीवी युवापिढीने हा सर्व खेळ या राजकीय पक्षांचा समजून घ्यावा…. 

     असं नाही की,भाजपचे सरकार गेले,मोदी/ शहा हटले आणि काँग्रेस व मीत्रपक्ष सत्तेवर आले किंवा राहुल गांधी प्रधानमंत्री झाले म्हणजे सर्व कांही आलबेल होईल या भ्रमात भारतीय जनतेने राहू नये….

      आता आम्ही 75 वर्षात पहिल्यांदा संविधानातून जागृत होतोय,पुन्हा आम्ही कधी झोपणार नाही.याची कटाक्षपणे दखल घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही त्याला जपू….

    तेंव्हाच आमची भावी पिढी आम्हांला धन्यवाद देईल….

    अन्यथा दोष दिल्याशिवाय राहणार नाही!

आवाहनकर्ता तथा जागृतीचा कृतिशील लेखक…

       अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद,7875452689…