Home Social त्या मृत्यदेहाचा केलाय अंतिम संस्कार….

त्या मृत्यदेहाचा केलाय अंतिम संस्कार….

शुभम गजभीये

विशेष प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत.. 

 

  चिमूर:-दिव्यवंदना आधार फाउंडेशन मधील बेवारस मृतदेहाचा मुस्लिम कब्रस्थान कमिटी,चिमूर द्वारा रितीरिवाज प्रमाणे आंघोळ करून नमाज अदा करून अंतिम दफन करण्यात आले आहे.

       दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा संचालित रोडवरील बेघर,निराधार,अनाथ,मनोरुगण पुनर्वसन केंद्र जामगाव येथे गेल्या आठ महिन्यापासून इब्राहिम शेख नामक व्यक्ती राहत होते प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मुस्लिम रीती रिवाजानुसार मुस्लिम कब्रस्थान कमिटी कडून अंतिम दफन विधी पूर्ण करण्यात आला.

      यावेळी मुस्लिम कब्रस्थान कमिटीचें दिव्यवंदना आधार फाउंडेशन अध्यक्ष शुभम पारकर यांच्या उपस्थितीत मुस्लिम कब्रस्थान कमिटीचे अध्यक्ष इरफानभाई,अफरोजभाई शेखफारुकभाई शेख,हाजीप अनिस शेख,आरीफभाई शेख,हाजी महेबुब मामू,बबलुभाई शेख,रुस्तम पठाण काका,जावेद पठाण ,हाजी बाबाभाई शेख,शानू शेख,गोलू पठाण, पप्पूभाई शेख असे अनेक मुस्लिम समाज व चिमूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थितीत होते.