Home देशविदेश आदरणीय सर्वसामान्य नागरिकांना औरंगाबाद येथील विशेष बैठकीचे आमंत्रण… — त्याचबरोबर राज्यातील...

आदरणीय सर्वसामान्य नागरिकांना औरंगाबाद येथील विशेष बैठकीचे आमंत्रण… — त्याचबरोबर राज्यातील इतर शहरातील नागरीकांना सुद्धा आवाहन….

           आज आपल्या देशातील संविधानविरोधीशक्ती सर्व शक्तिनीशी सर्व कसोटी पणाला लावून लोकशाही आणि संविधान संपवत आहे. त्यात सर्वात महत्वाचे आपले मूलभूत हक्क म्हणजेच मतांचा अधिकार हिरावून घेऊन आपल्या सर्वाना गुलाम बनविण्याचा जणू विडा उचलला आहे.

       त्यासाठी सर्व संविधानिक संस्था मनुवाद्यांनी अर्थात RSS ने येनकेन प्रकारे मिळविलेल्या सत्तेच्या बळावर ताब्यात घेऊन स्वतःला सोईस्कर असे निकाल मिळवून घेत आहे. यामध्ये सर्वात जास्त काम केंद्रीय निवडणूक आयोग जास्तच कामाला लागले आहे. या आयोगाने मतदार याद्या अद्यावत करण्याच्या नावाखाली 65 लाख मतदारांची नावे जिवंत असताना मृत म्हणून घोषित करून गाळली आहेत. देशात एकूण 7 कोटी 24 लाख मतदार गाळली आहेत. आणि बोगस नावे घुसवून भाजपला मतदान करायला भाग पाडले आहेत. एका एका नावाचे 8/8 ठिकाणी नावे घुसवली आहेत. या सर्वांचा अर्थ एकच आहे की या देशातील मतदारांचे हक्क असे कूटनितीच्या मार्गाने हिरावून घेतले की मग देशातून लोकशाही आणि संविधान संपवून हळू हळू मनुस्मृती लागू करण्यासाठी सोपे होईल आणि शताब्दी वर्षे साजरे करता येईल. यासाठीच भाजपचा आणि हतबलतेने त्यांच्या राजकीय मित्रपक्षांचा आटापिटा चालू आहे.

            त्यांचा हा प्रयत्न कायमचा हाणून पाडण्यासाठी सर्वसामान्य भारतीय जनतेने आपापल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्व संविधानवादी विरोधी राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटना आणि आपण सर्वसामान्य जनता मिळून महामोर्चाचे आयोजन करावे.

यामध्ये पुढीलप्रमाणे मागण्या प्रामुख्याने असल्या पाहिजे.

(1) आजपासून कोणत्याही निवडणुकीतून EVM + VVPAT कायमचे या देशातून हटवीलेच पाहिजे.

(2) अद्यावत मतदार याद्या निर्माण करण्याच्या नावाखाली चालवलेला बोगसपणा निवडणूक आयोगाने ताबडतोब बंद केला पाहिजे.

(3) महाराष्ट्र विधानसभेने पारित केलेला जनसूरक्षा कायदा रद्द करून स्थापन केलेला नरेंद्र जाधव समितीला महाराष्ट्र सरकारने बरखास्त करावे.

       या प्रमुख मागण्यासाठी आपण (सर्व सामान्य जनतेच्या) मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी त्या त्या जिल्हाधिकारी, तहसील, विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करावे……….

        कारण आपण गप्प बसणे म्हणजे संविधान विरोधी शक्तीची ती संपत्ती आहे.आपण गप्प बसून गुलामी ओढवून घ्यायची नाही. कारण शेवटी……

         जनता की अदालत सर्वात महान असते. हे जगात फ्रेंच राज्यक्रांतीने दाखवून दिले आहे. शिवाय आपल्या देशात दीड वर्षे पंजाब आणि हरियाणा शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घ्यायला भाग पाडले. हे आपल्या देशाचे उदाहरणं आहे.

आम्ही औरंगाबाद येथे महामोर्चाचे आयोजन आयोजन करत आहोत…..

          त्यासाठी गांधी भवन, विभागीय ग्रंथालयाशेजारी येथे सर्व जनता, संविधानवादी सर्व विरोधी राजकीय पक्ष आणि सर्व सामाजिक संघटना यांची महामोर्चाच्या आयोजना संदर्भात बैठक बोलावलेली आहे. तेंव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे. त्यांनी 24/ 08 /2025 रोजी रविवारी दुपारी 12 : 30 वाजता या बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती करत आहे………..

  आवाहनकर्ता :- अनंत भवरे

 संविधान विश्लेषक,औरंगाबाद 7875452689