Home देशविदेश ज्या सुखा कारणे देह वेडावला…

ज्या सुखा कारणे देह वेडावला…

      “ज्या सुखा कारणे देव वेडावला”जे देवाचे भक्त झाले आणि देवासाठी वेडेपण झाले ते म्हणजे संत, या संतांचा संग लाभावा आणि त्यांची सेवा घडावी म्हणून पांडुरंगाने त्यांना देवळात न बोलवता स्वतः देऊळ सोडून त्यांच्या घरी गेला आणि त्यांची कामे त्यांचे सोबत करू लागला, म्हणजे संतांना भक्तांना त्यांच्या कामात मदत करू लागला. संताचे आणि देवाचे हे असे नाते आहे. भक्ताचे रूपांतर संतात होते आणि संत हे सर्व काही विसरून संसार सोडून देवासाठी येडे होतात, आणि देव संतांसाठी वेडा होतो, आणि समविचारी समस्या भावाचे दोन वेडे एकत्र आले की त्यांना सुख मिळते. या सुखासाठी दोघेही वेडे व्हावे लागते, दोघांपैकी एकटा वेडा होऊन चालत नाही, तसे असेल तर दोघांनाही सुख मिळत नाही, सुखाचे हे असे आहे. ज्याच्यापासून आपल्याला सुख हवे आहे त्याच्या संगतीत राहिल्याशिवाय आणि नुसती संगतीतच राहून चालणार नाही तर त्याला त्याच्या कामात हातभार लावल्याशिवाय किंवा त्यास त्याचे काम हलके करण्यासाठी आपण मदत केल्याशिवाय खरे सुख मिळत नाही हेच देव आणि संत यांच्या नात्यातून शिकायला मिळते. 

           सर्वसामान्य माणसांचे मात्र असे नाही, तर सुखे कारणे देह वेडावला, अशी आहे. भक्त शांत आणि सामान्य माणूस या दोघांच्या सुखामधील फरक हा आहे की, सामान्य माणूस हा स्वतःच्या देहाचा विचार करतो, स्वतःच्या मनाचा विचार करतो, आणि फक्त संत देव मात्र दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात. स्वतःच्या सुखाला दुय मानतात किंवा स्वतःचे सुख त्यांना दिसतच नाही, केवळ दुसऱ्याचे सुखच ते डोळा भरून पाहू इच्छितात, त्यातच त्यांना आनंद मिळतो. संत आणि महामानवांचे हे असेच आहे. हे स्वतःच्या शरीराचा मनाचा स्वतःच्या संसाराचा विचार न करता आम जनतेच्या मनाच्या शरीराच्या सुखाचा विचार करतात.

         जगातील प्रत्येक माणसाला शारीरिक आणि मानसिक आणि भौतिक सुख मिळायला पाहिजे याचा ध्यास चिंतन महामानव आणि संत करीत असतात, अर्थात महामानव भौतिक सुखाचा विचार करतात, तर संत हे माणसाच्या मानसिक आणि अध्यात्मिक सुखाचा विचार करतात. म्हणून संत आणि महामानवांचे सर्वसामान्य लोकांवर अनंत अनंत कोटी उपकार आहेत. म्हणूनच संत आणि महामानव हे आजही जिवंत आहेत, आणि सर्वसामान्य माणूस त्यांना डोक्यावर घेऊन नाचतो आहे, पण चुकीची गोष्ट अशी की, त्यांचे विचार डोक्यात घेत नाही, केवळ संतांचे आणि महामानवांचे भक्त होऊन सर्वसामान्य माणसे नाचत आहेत, ही एक मोठी समस्याच होऊन बसलेले आहे, आणि ही समस्या सर्वसामान्य माणसांचीच आहे, ती सोडविल्याशिवाय सर्वसामान्य माणूस हा सुखी होणार नाही. 

         “सुखे कारणे देह वेडावला” याचा अर्थ या देहाला आणि मनाला सुख पाहिजे, बहुतेक गरजा पूर्ण झाल्याशिवाय शरीर सुख मिळत नाही आणि मानसिक गरजा पूर्ण झाल्याशिवाय माणसाची मानसिक भूक थांबत नाही, हे एक नैसर्गिक सत्य आहे, जे शहाण्या माणसाने मान्यच केले पाहिजे. 

      “शरीर सुख”हे माणसाच्या ज्या प्राथमिक गरज आहेत म्हणजे मूलभूत गरजा उदाहरणार्थ पाणी वस्त्र निवारा आरोग्य . यानंतर माणसाची दुसरी गरज म्हणजे सुखसोयीच्या गरजा, म्हणजेच शिक्षण नोकरी रोजगार काम धंदा की ज्यामुळे चार पैसे हातात जमतील आणि त्या पैशाच्या माध्यमातून माणसाच्या प्राथमिक आणि दुय्यम गरजा पूर्ण होऊ शकतील, माणसाची तिसरी गरज म्हणजे बहुतेक गरज जात नागरी सुविधांचा समावेश होतो उदाहरणार्थ रस्ते वाहतुकीची साधने वीज पाणी फोन सुविधा, कायदा संरक्षण न्याय मैत्री लोक सहभाग इत्यादी सामाजिक आणि भौतिक गरजा. ह्या दुय्यम गरजा जीवन जगण्यासाठीच्या आवश्यक किंवा मूलभूत गरजा जरी नसल्या तरी सुख देणाऱ्या गरजा आहेत म्हणूनच माणसाने आपली प्रगती करत असताना आपल्या शारीरिक गरजा भागविण्याबरोबरच ह्या भौतिक गरजांचा पण विचार करून त्यात विकास घडवून आणलेला आहे. 

        माणसाची चौथी गरज म्हणजे, चैन. ही गरज बहुतांशी मानसिक गरज सुद्धा आहे, कारण माणूस अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य नोकरी प्रवास या सर्व गरजांची पूर्तता केल्यानंतरही किंवा करत असताना त्यास जो त्रास होतो किंवा त्याची जी त्रिधा तिरपीट होत असते तेव्हा तो थकलेला असतो तो थकवा जाण्यासाठी म्हणून माणसाला विरंगळा हवा असतो, शांतता हवी असते, शांततेचे हे सुख म्हणजेच चैनीची गरज होय. माणसाला चैन करावीशी वाटते, मग तो गरीब असो मध्यम असो की श्रीमंत असो. सहलीला जावेसे वाटते, गाणी म्हणावीत किंवा ऐकावी, डान्स करावा किंवा बघावा, उद्यानात जावे, मित्र मैत्रिणी सोबत मोकळ्या मनाने गप्पा माराव्यात, आपली सुख आणि दुःखे कुणापुढे तरी सांगून मन हलकं करावं, चित्रकला हस्तकला खेळ असे काही छंद जोपासावेत, आणि या सर्व गोष्टी द्वारे मनावर आलेले दडपण किंवा बेचैनी दूर करावी, म्हणजे मन आणि शरीर रिलॅक्स होते, हा अनुभव बऱ्याच लोकांच्या पाठीशी असतो, या अनुभवाचे अनुकरण होत असते. माणूस आपल्या प्राथमिक आणि सुखसोईच्या गरजा भागवण्यासाठी जी धडपड करत असतो त्यामुळे मनावर जे दडपण येते ते दडपण नाहीसे करणे हीसुद्धा माणसाची एक नैसर्गिक गरज होऊन बसते, यासाठी माणूस यावर उपाय म्हणून दोन मार्ग आहेत एक चांगला मार्ग आणि दुसरा वाईट मार्ग चांगला मार्ग म्हणजे छंद जोपासणे आणि दुसऱ्या मार्ग म्हणजे वाईट गोष्टीच्या मागे लागणे की ज्यामुळे सुखच हरवून बसेल.

       उदाहरणार्थ व्यसनाधीन होणे आणि भ्रष्टाचार करणे. असा चुकीचा मार्ग धरणाऱ्या माणसासाठी सुख हे केवळ सुख न राहता ते मृगजळ ठरते. शरीराचे सुख असो की मनाचे सुख असो त्या सुखाला मर्यादित जर ठेवले तरच त्या सुखाचा माणसाला जीवन आधार साठी उपयोग होतो नाहीतर अमर्यादित चैन करणे हे जीवन उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरते. म्हणून सुखसुईच्या गरजा भागवत असताना किंवा चैनीच्या गरजा पूर्ण करत असताना त्यात मर्यादा पालनाचे सूत्र जर अंगीकारले तर ती चैनीची गोष्ट सुद्धा माणसाला शारीरिक आणि मानसिक सुख देऊन जाते, यामुळे निसर्गतः माणसाला शारीरिक मानसिक आणि भौतिक गरज आहे या तीनही या मार्गाने माणसाच्या गरजा पूर्ण होऊ शकतील आणि त्याला दुःखातून मुक्ती मिळू शकेल.

       मोह हे दुःखाचे मूळ कारण आहे असे गौतम बुद्धांनी सांगितले आहे, तरीपण प्राथमिक गरजा भागवणे दुय्यम गरजा भाग होणे आणि चैनीची गरज भागवणे ही माणसाची नैसर्गिक गरज आहे आणि त्यामुळे याबद्दल माणसाला मोह हा होत राहणारच आहे, कारण निसर्ग सत्य आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल, म्हणून भौतिक व्यवस्था ही माणसाला सुख देणारी नसेल तर अशा व्यवस्थेत म्हणजेच विषमतावादी व्यवस्थेत माणूस मोह सोडणे शक्य नाही, कारण जोपर्यंत गरज पूर्ण होणार नाही तोपर्यंत माणसाला मोह असणारच आहे, गरज आणि मोह यामध्ये जमीन आसमांचा फरक आहे.

         गरज भागवण्यासाठी माणसाला इच्छा होते म्हणून तो अपेक्षा करतो म्हणून त्याला मोह होतो अर्थात अतिव ही गोष्ट चुकीची आहे परंतु इच्छा होणे हे नैसर्गिक आहे, हे सत्य आपणास मान्यच करावे लागते. म्हणून संत महात्मे ऋषीमुनी कोणीही कितीही जरी मोह सोडण्याचा उपदेश केला तरी तो सुटत नाही हे लाखो वर्षापासून चे ऐतिहासिक सत्य आहे, यावर एक उपाय आहे तो म्हणजे समतेची भौतिक रचना, समतावादी भौतिक व्यवस्था, अशा व्यवस्थेतच माणूस सम्यक विचार सम्यक दृष्टी प्राप्त करू शकतो, विषमतावादी परिस्थिती आणि माणसाच्या जीवनातील विषमता ही माणसाला मोहमुक्त करू शकत नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते मी क्षमतावादी व्यवस्थेमुळेच सुखे कारणे देह वेडावला.माणसाचा देह सुखाच्या मागे लागला त्याचे हे कारण आहे.

        लेखक : दत्ता तुमवाड

           सत्यशोधक समाज नांदेड

        दिनांक: 22 ऑगस्ट 2025. फोन: 9420912209.