साकोली येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

साकोली येथील विश्रागृहात वंचित बहुजन आघाडी तालुका महिला आघाडीची सभा भंडारा गोंदिया जिल्हा निरीक्षक सुनिता टेंभुर्ण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली तर सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका संघटक प्रशिकं मोटघरे, यादोराव गणवीर कार्यक्रमाचे आयोजक शितल नागदेवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

        सभेमध्ये महिलांचे संघटन कसे वाढेल,गाव पातळीवर संघटन वाढवण्याचा राबविण्याचा प्रयत्न कसे करता येईल येणाऱ्या विधानसभा मध्ये वंचित बहुजन आघाडी परत आपला परफॉर्मस कसं वाढवेल असे विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

       तसेच सुनीता टेंभुर्ण, डी जी रंगारी, जगदीश रंगारी, प्रशिक मोटघरे यांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे आयोजक शितल नागदेवे यांनी संचालन केले तर आभार स्वर्णमाला गजभिये यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सरिता बडोले, सुशीला हुमणे, जिजा कोल्हे, नितेश डोंगरे, अनमोल हू, सपना गणवीर, अलका गणवीर, साक्षी गणवीर ,मनीषा खोब्रागडे ,कमला रंगारी, सविता जनबंधू, प्रतिमा राऊत, व भरपूर महिला याप्रसंगी उपस्थित होते.