नवनियुक्त सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते सत्कार…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

सिरोंचा:- तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले असून नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष,माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

सिरोंचा तालुक्यात नुकतीच ग्रामपंचायत पोटनिवडणूक घेण्यात आली. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर तथा जि प च्या माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती.बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्पित उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.तर,काही ठिकाणी एकहाती सत्ता बसविण्यात राकॉला यश आले.

      या पोटनिवडणुकीत सरपंच आणि उपसरपंच पदावर विराजमान झालेले तसेच इतर सदस्यांचे भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी भाग्यश्री ताई आत्राम यांनी गावातील विविध समस्यावर त्यांच्याशी चर्चा केल्या तसेच प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेऊन त्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर विकास कामांसाठी आवश्यक असलेली निधी उपलब्ध करून देण्याचे हमी दिले.

      या सत्कार समारंभ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी, सत्यनारायण परपटला, श्रीनिवास कडार्ला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.