ब्रेकिंग न्युज… हात चलाखीने दुकानदारांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड… — स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिणची कार्यवाही…

  अबोदनागो चव्हाण

तालुका प्रतिनिधी चिखलदरा

          अमरावती ग्रामीण पोलीस गुन्हे शाखा अन्वये वरिष्ठ जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली,”हात चालाखीने फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला गजाआड करण्यात आले.

       स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पथकास गोपनिय माहिती मिळाली कि,चिखलदरा परीसरात एक इराणी महिला व दोन पुरुष संशयितरित्या फिरत आहेत.

       अशा गोपनिय माहिती वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर टोळीवर सतत दोन दिवस लक्ष ठेवुन माहीती घेतली असता समजले कि,सदर टोळीतील पुरुषांचे नाव व पत्ता १) यावर अब्बास काझीम हुसेन वय ३६ वर्ष,२) खादम हुसैन काझीम हुसेन सैयद वय ४३ वर्ष तसेच महिलेचे नाव ३) कुबरा खादम सैयद वय ३३ वर्ष,तिन्ही रा. इंदिरानगर आबिवली,जि.ठाणे असे असुन ते हात चलाखीने गुन्हे करण्यात सराईत आहेत. 

          तसेच पो.स्टे.खालापुर जि.रायगड व पो.स्टे.खडकपाडा जि.ठाणे येथील गुन्ह्यात फरार असुन त्यांचा शोध सुरु आहे.

           दिनांक १९/०२/२०२४ रोजी स्थागुशा अमरावती ग्रामीण पथकाने रायगड व ठाणे पोलिस यांचे सोबत संपर्क करुन सदर आरोपीबाबत सविस्तर माहीती घेतली.पो.स्टे.खडकपाडा जि.ठाणे व खालापुर जि.रायगड पोलिसांनी आरोपी हे त्यांचे गुन्ह्यात पाहीजे असल्याचे कळवुन ते अमरावती येथे हजर आले.

        सदर दोन्ही पोलिस पथक परतवाडा शहरात पोहचुन त्यांनी स्थागुशा अमरावती ग्रामीण पथकांना सदर आरोपी यांना ताब्यात घेणे कामी मदत मागितली असता स्थानीक गुन्हे शाखा अमरावती पथकाने परतवाडा शहरात लक्ष ठेवुन असलेल्या टोळीतील दोन पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतले.

          संशयित इसमांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली.परंतु त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यातील दोन पुरुषांनी रायगड जिल्ह्यातील तसेच इतर भागात दुकानदारांना विशेष नंबरची नोट पाहीजे आहे,नोट मिळुन आल्यास जास्त पैसे देवुन नोट घेतो असे आमिष देवुन दुकानदार हे नोटवरील नंबर पाहत असता हातचलाखीने पैसे काढुन घेवुन त्यांची फसवणुक केल्याचे सांगितले.

     टोळीतील पुरुष पो.स्टे. खालापुर जि.रायगड अपराध क. ७१/२४ कलम ४२०,३४ भादवि मध्ये आरोपी असुन महिला आरोपी कुबरा खादम सैयद हि पोलिस स्टेशन खडकपाडा जि.ठाणे अप.क.५०१/२०२३ कलम ३०७,३९९ भादंवि सह कलम ३ (१) (!!), ३(२), ३ (४) महाराष्ट्र सघंटित गुन्हेगारी नियत्रंण अधिनियम १९९९ (मोक्का) मध्ये आरोपी आहे.

       त्यावरुन तिन्ही आरोपींना संबधीत पोलिस स्टेशनचे पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे.सदर तिन्ही आरोपी यांचेवर विविध भागात फसवणुकचे तसेच इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले.

       सदरची कारवाई श्री.विशाल आनंद पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण,श्री.पंकज कुमावत अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात श्री.किरण वानखडे पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात सहा.पोलिस निरीक्षक सचिन पवार,पोलिस अंमलदार युवराज मानमोठे,रविंद्र वऱ्हाडे,स्वप्नील तंवर,सागर नाठे,शांताराम सोनोने,महिला पोलिस वृषाली वाळसे,चालक निलेश येते यांनी केली.